मुंबई : यंदा इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या विश्वचषकातून पाकिस्तान संघाला बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या बीबीसीआयची मागणी आयसीसीने फेटाळून लावली आहे. आयसीसीच्या नियमावलीमध्ये अशा कारणासाठी एखाद्या संघाला बहिष्कृत करण्याचा कोणताही नियम नाही. त्यामुळे बीसीसीआयच्या या मागणीला आयसीसीच्या बैठकीत पाठींबा मिळाला नाही.


14 फेब्रुवारीच्या पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर क्रिकेटच्या मैदानावरही भारताने पाकिस्तानला घेरण्याची तयारी सुरु केली. दहशतवाद पसरवणाऱ्या देशांना बहिष्कृत करण्यासंबंधीचं पत्र बीसीसीआयने आयसीसीला पाठवलं होतं. त्या पत्रात भारताचा रोख पाकिस्तानकडे होता.

दरम्यान भारत आणि पाकिस्तान संघांत 16 जूनला वन डे विश्वचषकाचा साखळी सामना होणार आहे. मात्र अद्याप बीसीसीआयने या सामन्यात पाकशी खेळण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. जर भारताने हा सामना खेळला नाही तर पाकिस्तानला संपूर्ण गुण मिळतील आणि भारतीय संघाचं नुकसान होईल," असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

विश्वचषक सामन्यावर बहिष्कार घालून पाकला विजयाचे आयते गुण का द्यायचे? : सचिन तेंडुलकर



आयसीसीली दिलेल्या पत्रात बीबीसीआयने काय म्हटले?

"शेजारील देश सातत्याने आपल्या जमिनीवर दहशतवादाला प्रोत्साहन देत असून भारताविरोधात दहशतवादाला आश्रय देत आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची भारताची अजिबात इच्छा नाही आणि भारत दहशतवादाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करणार नाही," असा बीसीसीआयने ई-मेल पाठवून पाकिस्तानला विश्वचषकातून बाहेर काढण्याचं आवाहन केलं होतं.

संबंधित बातम्या

पाकिस्तानला विश्वचषकातून बाहेर काढा, बीसीसीआय आयसीसीला पत्र लिहिणार

विश्वचषक सामन्यावर बहिष्कार घालून पाकला विजयाचे आयते गुण का द्यायचे? : सचिन तेंडुलक

पाकिस्तानला कोंडीत पकडणं भारताच्या अंगलट