Serena Williams : जगातील अव्वल दर्जाची महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams) लवकरच तिच्या दमदार अशा टेनिस कारकीर्दीला अलविदा करणार असल्याचं समोर येत आहे. सेरेनाच्या निवृत्तीबद्दल तिने स्वत:च (Serena Williams Retirement) संकेत दिले आहेत. ती पुढील काही आठवड्यात निवृत्त होईल असं तिच्या एका नुकत्याच करण्यात आलेल्या सोशल मीडिया पोस्टमधून समोर येत आहे.
सेरेना एक अव्वल दर्जाची टेनिसपटू असून ती अनेक मोठमोठ्या ब्रँन्डची जाहीरात करताना त्यांच्यासाठी खास फोटोशूट करत असते. वॉग्यू (Vogue) या प्रसिद्ध ब्रँडसाठी नुकत्याच तिने केलेल्या एका फोटोशूटचे फोटो अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना त्याच्या कॅप्शनमधून सेरेनाने निवृत्तीचे संकेत दिले.
काय म्हणाली सेरेना?
सेरेनाने पोस्ट केलेल्या फोटोत तिने लिहिले आहे की, “आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला वेगळ्या दिशेने जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर खूप प्रेम करता तेव्हा तो काळ नेहमीच कठीण असतो. माझ्या चांगुलपणाने मी टेनिसचा आनंद घेतो. मात्र, आता काऊंटडाऊन सुरु झालं आहे. मला एक आई म्हणून आता जगायचं आहे.'' दरम्यान सेरेनाने आई म्हणून जगण्यावर अधिक लक्ष द्यायचं या पोस्टमध्ये लिहिलं असल्याने ती लवकरच खेळातून निवृत्त होईल असं दिसून येत आहे.
पाहा पोस्ट-
यंदा विम्बल्डनमध्ये पहिल्याच फेरीत पराभूत
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर वर्चस्व गाजवणारी सेरेना विल्यम्सला (Serena Williams) विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागल्याने स्पर्धेबाहेर पडली होती. विम्बल्डन 2020 च्या स्पर्धेतील पहिल्या फेरीत फ्रान्सच्या हार्मनी टॅनविरुद्ध (Harmony Tan) विल्यम्सला 7-5, 1-6, 7-6 (10-7) असा पराभव स्वीकारावा लागला. 40 वर्षीय सेरेनानं 364 दिवसांनंतर महिला एकेरीच्या सामन्यात पुनरागमन केलं होतं. विम्बल्डनमध्ये जागतिक क्रमवारीत 115 व्या स्थानावर पदार्पण करणाऱ्या फ्रान्सच्या हार्मोनी टेनविरुद्धच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात तिला अखेर 7-5, 1-6, 7-6 (10-7) असा पराभव पत्करावा लागला. गुरुवारी दुसऱ्या फेरीत टेनचा सामना 32व्या मानांकित स्पेनच्या सारा सोरिबेस टोर्मोशी होईल, जिनं पहिल्या फेरीत अमेरिकेच्या क्रिस्टीना मॅकहेलचा 6-2, 6-1 असा पराभव केला. याआधी
सेरेनाने तिचा शेवटचा एकेरी सामना गेल्या वर्षी 29 जून,2021 रोजी विम्बल्डनमध्ये खेळला होता, पण पहिल्या सेटमध्येच दुखापतीमुळे ती बाहेर पडली होती. विम्बल्डनमध्ये सात वेळा माजी चॅम्पियन राहिलेल्या 40 वर्षीय सेरेनाने विजयाची नोंद करताना दोन गुणांची प्रगती केली. विल्यम्सनं सहा वर्षांपूर्वी तिच्या सात विम्बल्डन एकेरी विजेतेपदांपैकी शेवटचे विजेतेपद जिंकलें. पण 2018 आणि 2019 मध्ये तिला फक्त अंतिम फेरीत प्रवेश करता आला.
हे देखील वाचा-