Gold Medal Tally of India in CWG : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये नुकतेच कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth games 2022) पार पडले. भारताने यंदा या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत एकूण 61 पदकांवर नाव कोरलं असून यामध्ये 22 सुवर्णपदकं देखील आहेत. तर 16 रौप्य आणि 23 कांस्य पदकं भारताने खिशात घातली आहेत. यंदा शूटींग हा भारतीय सर्वात यशस्वी असणारा खेळ नसल्याने सर्वाधिक पदकं भारताला कुस्तीत (Wrestling) मिळाली आहेत. भारताच्या 12 च्या 12 कुस्तीपटूंनी पदकं मिळवली असून 10 पदकं वेटलिफ्टिंगमध्ये (Weightlifting) भारताने मिळवली आहेत. बॉक्सिंगमध्येही (Boxing) भारताने 7 पदकं जिंकली आहेत. तर यंदा भारत 61 पदकांसह चौथ्या स्थानी राहिला असून 2002 पासून ते 2022 पर्यंत भारताची कॉमनवेल्थ गेम्समध्ये कामगिरी कशी होती हे थोडक्यात पाहू.... 


2002 कॉमनवेल्थ गेम्स, इंग्लंड


इंग्लंडच्या मँचेस्टरमध्ये पार पडलेल्या 2002 सालच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय संघाने शानदार प्रदर्शन करत एकूण 69 पदकं जिंकली. यामध्ये तब्बल 30 सुवर्णपदकांवर भारताने कब्जा केल्याचं पाहायला मिळालं.


2006 कॉमनवेल्थ गेम्स, ऑस्ट्रेलिया


2006 साली ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने एकूण 50 पदकं मिळवली ज्यातील 22 पदकं ही सुवर्णपदकं होती.


2010 कॉमनवेल्थ गेम्स, भारत


2010 साली भारतात पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने शानदार प्रदर्शन करत इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. भारताने स्पर्धेत तब्बल 38 सुवर्णपदकांसह 101 पदकं जिंकली. ज्यामुळे भारत गुणतालिकेतही दुसऱ्या स्थानी राहिला.


2014 कॉमनवेल्थ गेम्स, स्कॉटलंड


स्कॉटलंडमध्ये 2014 साली पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने एकूण 61 पदकं जिंकली, ज्यातील 15 सुवर्णपदकं असल्याचं पाहायला मिळालं.


2018 कॉमनवेल्थ गेम्स, ऑस्ट्रेलिया


2018 कॉमनवेल्थ गेम्समध्ये ऑस्ट्रेलियामध्ये भारताने एकूण 66 पदकं जिंकली. ज्यात 22 सुवर्णपदकं होती. 


2022 कॉमनवेल्थ गेम्स, इंग्लंड


यंदा इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये कॉमनवेल्थ गेम्स 2022 स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताने एकूण 61 पदकांवर नाव कोरलं असून यामध्ये 22 सुवर्णपदकांवर भारताने नाव कोरलं.


हे देखील वाचा-