नवी दिल्लीः भारतीय हॉकी टीमच्या आशियाई चाम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.


'आता नो मौका मौका, बाप बाप होता है' अशा शब्दात विरुने पाकिस्तानला हरवल्याबद्दल हॉकी टीमचं अभिनंदल केलं आहे. भारतीय हॉकी टीमने काल पाकिस्तानचा अंतिम सामन्यात 3-2 असा धुव्वा उडवला.

https://twitter.com/virendersehwag/status/792751101468639232

विरु नेहमीच्या त्याच्या ट्विटर इनिंगसाठी ओळखला जातो. यावेळीही विरुने षटकार लगावला. पाठीवर आईचा आशिर्वाद होता म्हणून भारतीय क्रिकेट संघ जिंकला आणि बाप हा बाप असतो, म्हणून हॉकी टीम जिंकली, असं विरु म्हणाला.

संबंधित बातमी : भारताला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीचं जेतेपद, पाकिस्तानचा धुव्वा