सांगलीः शहीद नितीन कोळी यांच्यावर सांगलीतील दुधगावमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा देवराज आणि भाऊ उल्हास यांनी नितीन यांना मुखाग्नी दिला. यावेळी अवघा जनसमुदाय शोकाकुल झाला होता.

शुक्रवारी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात नितीन कोळी शहीद झाले होते. श्रीनगरच्या लष्करी तळावर लष्कराने त्यांना अंतिम सलामी दिली होती. त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांचं मूळगाव असलेल्या सांगलीतील दुधगावमध्ये आणण्यात आलं होतं.

यावेळी नितीन कोळी यांच्या अंत्यदर्शनासाठी अवघी अलोट गर्दी जमली होती. एकीकडे नितीन कोळी यांचा अंत्यविधी सुरु होता आणि दुसरीकडे 'शहीद नितीन कोळी अमर रहे, पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणा दिल्या जात होत्या.

अपडेटः

नितीन कोळींचे भाऊ उल्हास कोळी आणि मोठा मुलगा देवराज मुखाग्नी देणार

वारणेच्या काठी शहीद नितीन कोळींना पोलिसांकडून मानवंदना

शहीद नितीन कोळी यांना आज अखेरचा निरोप, अंत्यसंस्कारासाठी चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, राजू शेट्टींची उपस्थिती, थोड्याच वेळात अंत्यसंस्काराला सुरुवात

दुधगावच्या वारणा नदीच्या काठी शहीद नितीन कोळी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार

शहीद नितीन कोळींच्या अंत्ययात्रेला सुरुवात, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार, नागरिकांची अलोट गर्दी



शहीद नितीन कोळींवर साडे दहा वाजता अंत्यसंस्कार होणार, अंत्ययात्रेसाठी गावातील रस्त्यांवर फुलांची चादर



शहीद नितीन कोळी यांचं पार्थिव दूधगावातील घरी दाखल, अंत्यदर्शनाला पंचक्रोशीतील नागरिकांची गर्दी



शहीद नितीन कोळी यांचं पार्थिव दूधगावात दाखल, संपूर्ण गावकऱ्यांना अश्रू अनावर

शहीद नितीन कोळी यांच्या घरी आणि त्यांनंतर साधारण एक तास कर्मवीर चौकात पार्थिव अंत्यदर्शनासठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात होईल.

----------------------------



यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी नितीन कोळी यांना श्रद्धांजली वाहिली. आज नितीन कोळी यांच्यावर त्यांच्या मूळगावी म्हणजे सांगलीतल्या दुधगावात अंत्यसंस्कार करण्यात येतील.



नितीन कोळी यांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी संपूर्ण दुधगाव तयारीला लागलं आहे. दरम्यान काल सकाळी नितीन कोळी यांना भारतीय लष्कराच्या जवानांनी सलामी दिली. त्यांचं पार्थिव दर्शनासाठी श्रीनगर येथील लष्करी तळावर ठेवण्यात आलं होतं. शुक्रवारी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात नितीन कोळी शहीद झाले.