मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग या जोडीने आपल्या खेळाने क्रिकेटच्या मैदानावर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण आता या दोघांनी ट्वीटमुळे सगळ्यांना संभ्रमात टाकलं आहे. दोघांच्या चॅटमुळे सोशल मीडियावर नेटीझन्स बुचकळ्यात पडले आहेत.

वीरेंद्र सेहवागने नुकताचा बीएमडब्लू कारसोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला. हा फोटो शेअर करताना त्याने सचिन तेंडुलकर आणि बीएमडब्लू इंडियाला मेंशन करुन आभार मानले.

https://twitter.com/virendersehwag/status/912693243732672513

सेहवागच्या या ट्वीटमुळे असं वाटतं की, सचिनने आपल्या जवळचा मित्र आणि सलामीचा साथीदार, वीरेंद्र सेहवागला तब्बल 1.14 कोटी रुपयांची बीएमडब्लू 7 सीरिज 730 एलडी ही कार भेट म्हणून दिली आहे.

पण सेहवागच्या ट्वीटला उत्तर देताना सचिनने लिहिलं आहे की, "तुझ्या स्वप्नातली कार खरेदी केलीस, याचा मला आनंद आहे. माझ्या आवडत्या कारपैकी ही कार आहे. ही कार चालवण्याची मजा काही औरच आहे."

https://twitter.com/sachin_rt/status/912739214302654464

आता सेहवागने ही कार स्वत:च्या पैशांनी खरेदी केल्याचं सचिनच्या ट्वीटवरुन वाटतं आहे. ही कार खरेदी केल्याने सचिनने सेहवागचं अभिनंदन केलं आहे.

मात्र सेहवागने ही कार खरेदी केली की त्याला गिफ्ट दिली हे दोन्ही माजी खेळाडूंच्या ट्वीटवरुन स्पष्ट होत नाही. अनेक जण हे गिफ्ट समजत आहेत तर सेहवागने कार खरेदी केल्याचं काहींना वाटत आहे. सत्य काय हे सध्यातरी दोघांनाच माहित आहे.



बीएमडब्लू 7 सीरिज 730 एलडी या कारची भारतातील किंमत 1.14 कोटी रुपये आहे. सेहवागने निवृत्ती घेतली त्यावेळी सचिन 'खरा साथीदार' म्हणाला होता. तर सचिन माझं प्रेरणास्थान असल्याचं सेहवाग वारंवार सांगतो.

दरम्यान, सचिनने यापूर्वी 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवणारी पीव्ही सिंधू, कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनाही बीएमडब्ल्यू कार भेट म्हणून दिली होती.