Savita Kanswal Dies in Uttrakhand Avalanche: जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest) पर्वतावर भारताचा तिरंगा फडकावणाऱ्या सविता कंसवालचा (Savita Kanswal) मंगळवारी उत्तराखंड (Uttarakhand) मधील उत्तरकाशी जिल्ह्यातील द्रौपदी पर्वताच्या हिमस्खलनात (Avalanche) मृत्यू झालाय. उत्तराखंडमधील द्रौपदी पर्वताच्या हिमस्खलनात सवितासह नेहरू पर्वतारोहण संस्थेचे 29 प्रशिक्षणार्थी अडकले होते, ज्यात सविताचाही समावेश होता. 


उत्तरकाशीस्थित नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनियरिंगचे प्राचार्य कर्नल अमित बिष्ट यांनी सविता कंसवालच्या मृत्युची पुष्टी केली. आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेल्या चार मृतदेहांमध्ये सविताच्या मृतदेहाचा समावेश आहे. आपणास सांगूया की, मंगळवारी हिमस्खलनाचा तडाखा बसल्यानंतर गिर्यारोहकांची 41 सदस्यीय टीम शिखरावर चढाई करून परतत होती. सविता कंसवाल या एनआयएममध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत होत्या. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच एनआयएमच्या पथकासह जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, सैन्यदल, आयटीबीपीचे पथक मदत व बचाव कार्यासाठी रवाना झाले. यासाठी हवाईदलाचे २ चित्ता हेलिकॉप्टर देखील मोहिमेसाठी तैनात करण्यात आले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या घटनेची दखल घेतली. 


ट्वीट-





 
सविताच्या गावात शोककळा पसरली
सविताच्या मृत्युची माहिती कळताच तिच्या गावात शोककळा पसरली आहे. या अपघातात सविता कंसवाल यांचा मृत्यू झाल्याची माहिती लोंथ्रू गावचे माजी सरपंच म्हणाले की, "सविताच्या कुटुंबातील अमित कंसवाल यांनी सांगितले की, आम्हाला रात्री उशिरा माहिती मिळाली की, सविताचा द्रौपदी पर्वताच्या हिमस्खलनात मृत्यू झाला."


सविताचा राष्ट्रीय विक्रम
सविता कंसवालनं यावर्षी 12 मे रोजी जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्टवर 8 हजार 848 मीटर उंच तिरंगा फडकावला होता. यानंतर 15 दिवसांनी सविता  8 हजार 463 मीटर उंच मकालू पर्वतावर पोहोचली होती.सविताने राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला होता. खराब हवामानामुळं 4 ऑक्टोबरला बचावकार्य थांबवण्यात आलं होतं. पण 5 ऑक्टोबरच्या सकाळपासून भारतीय वायुसेनेनं पुन्हा बचावकार्याला सुरुवात केली.


हे देखील वाचा