Dussehra Rath Yatra :  पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi) हे हिमाचल प्रदेशमधील कुल्लू येथील दसऱ्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रथयात्रेत सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत हमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयमराम ठाकूर उस्थित होते. पंतप्रधान मोदी आज हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. रथयात्रेत सहभागी होण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी जनसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी गेल्या आठ वर्षात भाजपचे सरकार आल्यापासून हिमाचल प्रदशचा विकास झाल्याचे सांगत मुख्यमंत्री ठाकूर यांचे कौतुक केले. 


पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या दोन-अडीच वर्षात संपूण जगभरात कोरोना महामारीचं संकट आहे. भारताने देखील या संकटना सामना केला. केंद्र सरकार आणि हिमाचर प्रदेशच्या सरकारने कोरोनाचा चांगला सामना केला आहे. आजच्या पिढीसाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठीही आम्ही मोठे काम करत आहोत. मेडिकल डिव्हाइस पार्कसाठी निवडलेल्या चार  राज्यांपैकी हिमाचल हे एक राज्य आहे. हिमाचल ही वीरांची भूमी  असून मी इथील अन्न खाल्ले आहे. या अन्नाचे कर्ज मी विकासाच्या रूपाने फेडणार आहे.   


"गेल्या आठ वर्षात डबल इंजिनच्या सरकारने हिमाचल प्रदेशच्या विकासाला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवले आहे. आज हिमाचल प्रदेशमध्ये सेंट्रल विद्यापीठ आहे. आयआयटी, आयआयआयटी आणि आयआयएम सारख्या मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्था आहेत. येणाऱ्या काळात देखील हिमाचल प्रदेशचा विकास अशाच वेगाने केला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिले.   







 पंतप्रधान मोदींनी हजारोंच्या गर्दीतून घेतले भगवान रघुनाथाचे दर्शन  


या रथ यात्रेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी प्रोटोकॉल तोडून रथाजवळ पोहोचत  भगवान रघुनाथांचे आशीर्वाद घेतले. यावेळी धालपूर मैदानावरील वाहतूक व्यवस्था सांभाळणारे दैवत धुमाळ नाग यांनी गर्दीवर नियंत्रण ठेववत कोणालाही पीएम मोदींच्या जवळ जाऊ दिले नाही. कुल्लू दसऱ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान सहभागी  झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भगवान रघुनाथांना बग्गा दुपट्टा, फुलांचा हार आणि प्रसाद मोदींना अर्पण करण्यात आले. हजारो लोकांच्या गर्दीत पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल 51  मिनिटे थांबून होते.