Rahane Becomes Father : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणेची पत्नी राधिकाने मुलाला जन्म दिला आहे. अजिंक्य रहाणेने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ही खुशखबर दिली. राधिका आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत, असे ट्विट राहणे याने केले आहे.

  


 






रहाणेने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर एक पत्र शेअर केले आहे. "बुधवारी सकाळी पत्नी राधिकाने मुलाला जन्म दिल्याची माहिती त्याने ट्विरद्वारे देली. या पत्राद्वारे त्याने चाहत्यांचे आभारही मानले आहेत. "आज सकाळी राधिका आणि मी माझ्या मुलाचे या जगात स्वागत केले. राधिका आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.  


अजिंक्य रहाणेने 2014 मध्ये राधिकासोबत लग्न केले. दोघांचे लग्न मराठी रितीरिवाजाने पार पडले. रहाणे आणि राधिका हे बालपणीचे मित्र आहेत. राधिकाने 2019 मध्ये एका मुलीला जन्म दिला होता. तिचे नाव आर्य आहे. महत्वाची बाब म्हणजे आर्या देखील 5 ऑक्टोबर रोजीच जन्मली आहे.   


आजच्याच दिवशी मुलीचा  जन्म 


 अजिंक्य रहाणेच्या मुलीचा जन्मही याच दिवशी झाला आहे एक हा योगायोग म्हणावा लागेल. त्याची मुलगी आर्या हिचा जन्म 5 ऑक्टोबर 2019 रोजी झाला होता आणि आज तीन वर्षांनंतर बुधवारी 5 ऑक्टोबर रोजी त्याची पत्नी राधिकाने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. 


अजिंक्याची पत्नी राधिकानं गेल्या काही दिवसांपूर्वी इन्टाग्रामवर बेबी बंपचा फोटो पोस्ट करत दुसऱ्यांदा आई होणार असल्याची माहिती दिली होती. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं बेबी बंप आणि हार्ट इमोजीसह 'आक्टोबर 2022' असं लिहलं होतं. अखेर आज सकाळी तिने मुलाला जन्न दिला.  


महत्वाच्या बातम्या


BCCI : बीसीसीआयकडून कॉन्ट्रॅक्टमध्ये 28 खेळाडूंना केलं सामाविष्ट, रहाणे, पुजारासह पंड्याला मोठा तोटा