Sanju Samson : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना 78 धावांनी जिंकत मालिका 2-1 ने खिशात घातली. या विजयात स्टार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन चमकला.भारताने 49 धावांत 2 विकेट गमावल्या होत्या. यानंतर संजू सॅमसन क्रीजवर राहिला आणि त्याने 110 चेंडूत कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. संजू या सामन्यात 114 चेंडूत 108 धावा करून बाद झाला. त्याने 3 षटकार आणि 6 चौकार मारले.






पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकाची दीर्घ प्रतीक्षा 


संजूने आतापर्यंत त्याने 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये 56.67 च्या सरासरीने 510 धावा केल्या आहेत. तर 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 19.68 च्या सरासरीने 374 धावा केल्या. या काळात संजूने केवळ एक आंतरराष्ट्रीय शतक झळकावले आहे. या एकदिवसीय सामन्यात तो दिसला. संजूने वनडेमध्ये 3 अर्धशतकं आणि टी-20मध्ये 1 अर्धशतकं झळकावली.






अशाप्रकारे संजूला त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील पहिल्या शतकासाठी 8 वर्षे आणि 40 आंतरराष्ट्रीय सामन्यांची प्रतीक्षा करावी लागली. या काळात त्यांची कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली आहे. विश्वचषकासह अनेक महत्त्वाच्या मालिकांमधूनही त्याला वगळण्यात आले होते. तो प्रत्येक वेळी त्याच्या क्षणाची वाट पाहत राहिला. यावेळी त्याला संधी मिळाली आणि त्याने अत्यंत निर्णायक सामन्यात शतक झळकावून संघाला विजयापर्यंत नेले.


संजू धोनी आणि द्रविडच्या क्लबमध्ये सामील 


या खेळीमुळे संजूनेही एक मोठा विक्रम केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो केरळ राज्याचा पहिला खेळाडू ठरला. तसेच, वनडेत शतक झळकावणारा संजू हा पाचवा भारतीय यष्टीरक्षक ठरला. या बाबतीत तो महेंद्रसिंह धोनी आणि राहुल द्रविडच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.






या शतकामुळे त्याला आणखी संधी मिळतील


संजू सॅमसनच्या खेळीने महान कसोटीपटू सुनील गावसकर सुद्धा प्रभावित झाले. 'स्टार स्पोर्ट्स'शी बोलताना सुनील गावसकर म्हणाले की, "मला या इनिंगमध्ये त्याची शॉट सिलेक्शन वेगळी वाटली. याआधी, सुरुवात करूनही तो आउट होत होता. तुम्ही त्याला या खेळीने चुकीचे म्हणू शकत नाही. चेंडूची वाट पाहून शतक केले. या शतकामुळे त्याला आणखी संधी मिळतील." ते पुढे म्हणाले की, मला वाटते की ते या स्तरावर तो स्वतःवर अधिक विश्वास ठेवण्यास सुरुवात करेल. कधीकधी तुम्हाला माहित असते की तुम्ही तिथे आहात, परंतु नशीब तुमच्या बाजूने नसते."  दिग्गज गावसकर पुढे म्हणाले, लक्षात ठेवा. त्याच्याकडे असलेली प्रतिभा आपल्या सर्वांना माहीत आहे. पण काही कारणास्तव त्याला ते जमले नाही, पण आज त्याने ते दाखवून दिले. केवळ प्रत्येकासाठीच नाही तर स्वतःसाठी देखील."