मुंबई : नवीन वर्षात राज्यातील दोन मोठ्या पदावर कोणता अधिकारी विराजमान होणार, याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. यातील एक पद राज्याचे मुख्य सचिव (Chief Secretary) आणि दुसरं पद राज्य पोलीस महासंचालक हे आहे.  राज्याचे मुख्य सचिवपदासाठी (Maharashtra Chief Secretary) आयएएस (IAS) नवरा- बायको स्पर्धेमध्ये आहेत. राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक (manoj saunik) 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.  पण मनोज सौनिक यांना पुन्हा मुदतवाढ देण्याची हालचाल सुरु असल्याच बोललं जात आहे. जर तसं झालं नाही तर राज्याचे मुख्य सचिवपदी त्यांच्या पत्नी सुजाता सौनिक या पदभार स्वीकारतील. म्हणून मुख्य सचिव पदाची रेस कोण जिंकणार? हे एका आठवड्यात निश्चित होईल. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणूकीच्या पार्वभूमीवर मनोज सौनिक यांना तीन ते सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठीच प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवला आहे. ज्याचा निर्णय या आठवड्यात येईल. सौनिक यांना मुदतवाढ न मिळाल्यास सीनियरिटीप्रमाणे सुजाता सौनिक यांना पदभार दिला जाण्याची चर्चा आहे. पण याचा एक मोठी लॉबी विरोध करत आल्याचं ही बोललं जात आहे. मनोज सौनिक यांना मुदतवाढ देणं योग्य नाही, कारण इतर अधिाकाऱ्यांवर अन्याय होईल. हे मत मुख्यमंत्री आणि दोन्ही उप मुख्यमंत्रांकडे काही कॅबिनेट सदस्यांनी मांडलं देखील आहे. पण त्यावर तिघांनीही भाष्य करणं टाळल्याचं बोललं जात आहे. 


चर्चा अशी ही आहे की एक लॉबी नवरा बायको दोघांना न करता आयएएस नितीन करीर यांना मुख्य सचिव करण्याच्या बाजूने जोर लावत असल्याचं ही बोललं जात आहे. काही जणांचा दबाव आहे की सुजाता सौनिक या 30 जून 2023 रोजी सेवानिवृ्त होणार आहेत. नितीन करीर हे 31 मार्च रोजी सेवानिवृत्त होतील. यामुळे नितीन करीर नंतर ही सुजाता सौनिक या मुख्य सचिव होऊ शकतात. यामुळे नितीन करीर यांना मुख्य सचिव करावं ही मागणी देखील केली जात आहे. पण जर मनोज सौनिक यांना राज्य सरकार ने 6 महिने मुदतवाढ दिली तर सुजाता सौनिक आणि नितीन करीर दोघेही मुख्य सचिव होऊ शकणार नाहीत. यामुळे मनोज सौनिक यांच्या मुदतवाढीला विरोध केला जात आहे. 


मनोज सौनिक यांचा परिचय..


मनोज सैनिक  हे महाराष्ट्र केडरचे 1987 बॅचचे आहेत,


मनोज सौनिक हे मूळचे बिहारचे आहेत.


 1989 ते 1990 मध्ये त्यांनी त्रिपुरामधये उप विभागीय अधिकारी म्हणून काम पाहिलं.


1990 मध्ये  सौनिक यांनी जालनाचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेला सुरुवात केली.


 1992 ते 1993 या एक वर्षाचा कालावधीत युकेमध्ये फॉरेन असाइन्मेंट साठी रवाना झाले होते.


1993 ते 1995 रायगडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे म्हणून काम पाहिलं. 


1995 ते 96 पुण्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं 


1996 ते 1998 जिल्हाधिकारी नाशिक 


 मार्च 1998 ते ऑक्टोबर 1998 जिल्हाधिकारी धुळे


 फेब्रुवारी 2006 ते जुलै 2009 खासगी सचिव सुशील कुमार शिंदे नवी दिल्ली 


जानेवारी 2010 ते नोव्हेंबर 2012 जॉईंट सेक्रेटरी डिफेन्स प्रोडक्शन नवी दिल्ली 


डिसेंबर 2016 ते जून 2018 प्रधान सचिव ट्रान्सपोर्ट आणि पोर्टस 


 नोव्हेंबर 2017 ते एप्रिल 2018 आयुक्त ट्रान्सपोर्ट आणि पोर्ट


 ऑगस्ट 2019 ते मे 2020 अतिरिक्त मुख्य सचिव वित्त विभाग 


मे 2020 ते जून 2023 अतिरिक्त मुख्य सचिव पब्लिक वर्क डिपार्टमेंट  


30 एप्रिल 2023 मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य एक मे 2023 ते 2 मे 2023 वित्त विभाग अतिरिक्त भार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक, धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावलेल्या सौनिक यांनी मंत्रालयात वस्त्रोद्योग, परिवहन विभागाचे प्रधान सचिव तर सार्वजनिक बांधकाम, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम केले आहे.