भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्याला आठ जूनपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यात धोनीची टीम इंडिया तीन वन डे आणि तीन ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडीजला रवाना होईल.
टीम-स्टाफसमोरच प्रितीची संजय बांगरला शिवीगाळ
ऑगस्ट 2014 पासून नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकापर्यंत संजय बांगरनं भारतीय संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यामुळं झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजयची मुख्य प्रशिक्षक म्हणून झालेली नियुक्ती ही त्याला मिळालेली बढती मानली जात आहे.
मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजय बांगर, आर श्रीधर आणि भारत अरुण यांच्या नावाची चर्चा होती. मात्र संजय बांगरच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अजिंक्य रहाणे उपकर्णधार
संजय बांगर हा मागील अनेक वर्षांपासून आयपीएलच्या किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाचा प्रशिक्षक आहे. तर आर श्रीधरही 2014 पासून किंग्ज इलेव्हन पंजाब संघासोबत आहेत.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी वन डे संघ - महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), के एल राहुल, फैज फैझल, मनीष पांडे, करुण नायर, अंबाती रायुडू, रिषी धवन, अक्षर पटेल, जयंत यादव, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, बरिंदर सरण, मनदीप सिंह, केदार जाधव, जयदेव उनाडकट, यजुवेंद्र चहल
झिम्बाब्वे दौऱ्याचं वेळापत्रक
11 जून – पहिला वन डे सामना
13 जून – दुसरा वन डे सामना
15 जून – तिसरा वन डे सामना
18 जून – पहिला टी-ट्वेन्टी सामना
20 जून – दुसरा टी-ट्वेन्टी सामना
22 जून – तिसरा टी-ट्वेन्टी सामना