मुंबई : निखी सहानी आणि बिंती सहानी.. मुंबईत राहणाऱ्या या जुळ्या बहिणींचा जसा चेहरा सेम टू सेम आहे, तशीच त्यांची बारावीची मार्कशिटही. यावर कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र या बहिणींच्या मार्कात साध्या पाईंटचाही फरक नाही

 

 

मुंबईच्या पोद्दार कॉलेजमध्ये शिकणाऱ्या निखी आणि बिंतीने बारावी परीक्षेत 650 पैकी 599 गुणांची कमाई केली आहे. म्हणजेच दोघींनी तब्बल 92.15 टक्के मार्क कमावले आहेत. एवढचं नव्हे तर गणित, ओसी आणि इकॉनॉमिक्स या तीन विषयांतही या दोघींना सारखेच मार्क मिळाले आहेत.

 

निखी आणि बिंतीचे बारावीचे गुण

 

विषय              निखी           बिंती

गणित              96               96

ओसी               92                92

इको                 86               86

अकाउंट्स        98               99

फ्रेंच                 97               99

ईव्हीएस          42               47

एकूण            599           599

टक्के           92.15       92.15℅

 

हे जुळं यश मिळवण्यासाठी या जुळ्या बहिणींचे प्रयत्नही जुळेच होते. निखी आणि बिंतीने आतापर्यंत खेळत, टीव्ही पाहत अभ्यास केला आणि यश मिळवलं. या दोघींना यशस्वी चार्टड अकाउंटंट बनायचं आहे.

 

जन्मापासून एकमेकांसोबत सावली सारख्या राहणाऱ्या निखी आणि बिंतींच्या कामगिरीमुळे त्यांच्या आईला गगन ठेंगणं झालं आहे.

 

त्यामुळे योगायोग कशाला म्हणतात हे निखी आणि बिंतीच्या कामगिरीनंतर वेगळं सांगण्याची गरज नाही.