Sania Mirza Reacts After Shoaib Malik Wedding : पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने तिसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सानिया मिर्झाचे वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. शोएब मलिकने सना जावेदसोबतच्या लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर शोएबपासून सानियाच्या घटस्फोटाची अफवा खरी ठरली आहे. आता सानियाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणावर मौन सोडले आहे.


शोएबला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!


निवेदनात सानियाची टीम आणि तिच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, "सानियाने तिचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच लोकांच्या नजरेपासून दूर ठेवले आहे. तथापि, आज शोएब आणि तिचा घटस्फोट होऊन काही महिने झाले आहेत, हे तिला सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. शोएबला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!



सानियाच्या या संवेदनशील काळात आम्ही सर्व चाहत्यांना आणि हितचिंतकांना विनंती करू इच्छितो की, त्यांनी कोणत्याही प्रकारची अंदाज व्यक्त करण्यापासून दूर राहावे आणि तिच्या गोपनीयतेच्या गरजेचा आदर करावा. दुसरीकडे, सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी पीटीआयला सांगितले की "ही'खुला' होती", जी मुस्लिम महिलेच्या तिच्या पतीला एकतर्फी घटस्फोट घेण्याच्या अधिकाराचा संदर्भ देते. शोएब आणि सानिया यांच्यातील मतभेदांबद्दल 2022 पासून जोरदार अफवा होत्या.  गेल्या काही वर्षांत ते क्वचितच एकत्र दिसले होते. काही दिवसांपूर्वी शोएब मलिकनेही सानियाला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले होते. शोएब आणि सानियाने एप्रिल 2010 मध्ये हैदराबादमध्ये लग्न केले होते. त्यांना एक मुलगा आहे.  


दुसरीकडे, 41 वर्षीय शोएबने अभिनेत्री सना जावेदसोबत तिसरे लग्न केल्याची घोषणा शनिवारी (20 जानेवारी) केली. या घोषणेनंतर लगेचच सना जावेदने तिचे इंस्टाग्राम बायो बदलून 'सना शोएब मलिक' असे केले. दरम्यान, मलिकचे व्यवस्थापक अर्सलान शाह यांनीही X ला या वृत्ताला दुजोरा दिला. शाह यांनी लिहिले की, आमचा लाडका सुपरस्टार शोएब मलिकने सना जाविदसोबत लग्न केलं आहे. आम्ही नवीन जोडप्याला आनंद आणि आनंदाने परिपूर्ण आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.


शोएब मलिकचे कुटुंब दु:खी 


दुसरीकडे, शोएबच्या कुटुंबातील एकही सदस्य या लग्नसोहळ्याला उपस्थित नव्हता. सानियासोबत ब्रेकअप झाल्याने नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले. मलिकचा मेहुणा इम्रान जफर म्हणाला की, त्यालाही सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाची माहिती मिळाली. सनाच्या लग्नाला शोएबच्या कुटुंबातील कोणीही हजेरी लावली नसल्याची पुष्टी त्याने केली. शोएबचे कुटुंब घटस्फोटाच्या बाजूने नसल्यामुळे वैवाहिक समस्या सोडवण्यासाठी 2022 च्या अखेरीस दोन्ही खेळाडूंचे कुटुंब दुबईला गेले होते. घटस्फोटानंतर शोएब मलिकचे कुटुंब खूप दुःखी होते आणि त्यांनी क्रिकेटरला त्यांच्या नात्यावर काम करण्यास सांगितले होते. त्याने सांगितले की, शोएब आणि सना दोघेही बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. असे असूनही, क्रिकेटरने अनेकवेळा अफवांचे खंडन केले होते.