Sachin Tendulkar, Interview : "बाबांबद्दल बोलायचं झालं तर तेव्हा मी फार लहान होतो.  बाबांचं लहानपण अलिबागला गेलं. लहानपणी आव्हान होती ती त्यांनी पार पाडली. शाळेत जाताना 8-10 किलोमीटर चालत जायचे, त्यांच्या सोबत एक कुत्रा होता ते सोबत जायचे. वाचण्याची आणि शिकण्याची एक आवड बाबांना होती.  अनेकांकडून मी ऐकलं होत काही गोष्टी आवडत नसताना कराव्या लागतात", असे भारताचा दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) म्हणाला. क्रिडा पत्रकार प्रसन्न संत यांनी सचिन तेंडूलकरची मुलाखत घेतली यावेळी तो बोलत होता. 


बाबांना कायम आव्हान आली, पण त्यांनी व्यक्त केली नाहीत


सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) म्हणाला, बाबांना कायम आव्हान आली, पण त्यांनी व्यक्त केली नाहीत, त्यांचे ते सोडवायचे आमच्यापर्यंत ते काही पोहचू देत नाहीत.  मुंबईला बाबा आले तेव्हा सर्व कुटुंब इकडे आले होते.  दादरला आम्ही राहिलो आमच्या दोन रुम होत्या तिथं एका कोपऱ्यात बाबा वाचत असतं.  बाबा अगोदर CID मध्ये होते तिथं नोकरी केली तिथं ते नोकरी करून शिकत होते. घरात आवाज खुप व्हायचा. त्यातही त्यांनी अभ्यास केला त्यांनी BA आणि MA मध्ये गोल्ड मेडल मिळवलं. बाबा असताना देखील आम्हाला कायम स्वातंत्र्य होतं, बाबा आहेत म्हणून कसली भीती नव्हती.  
असंही सचिनने (Sachin Tendulkar) सांगितलं. 


मी गाडी घेतली, तेव्हा वांद्रेवरून वानखेडेला प्रॅक्टिसला जायचो


पुढे बोलताना सचिन (Sachin Tendulkar) म्हणाला, मी (Sachin Tendulkar) गाडी घेतली, तेव्हा वांद्रेवरून वानखेडेला प्रॅक्टिसला जायचो. तेव्हा बाबांना कीर्ती कॉलेजला सोडायचो तेव्हा कायम बाबा पुस्तक वाचत बसायचे.  मी गाणी लावून जायचो तरी ते पुस्तकं वाचत बसायचे.  बाजूला ट्रॅफिक गाडीत गाणी तरीही बाबा वाचत जायचे यातून मोठा धडा त्यावेळी मिळाला होता.  मी बांद्रानंतर शारदा श्रम जॉईन केली, बांद्रावरून कबुतर खाना पोहचायला वेळ लागायचा. त्यानंतर मी दादरला काका-काकूंकडे राहिलो. चार वर्ष तिथं राहिलो क्रिकेट जास्त आवडायला लागलं. तेव्हापासून स्वप्न होत की इंडियासाठी खेळायच आहे आणि वर्ल्ड कप जिंकायचा आहे. मी प्रॅक्टिस करून खूप थकायचो घरी येऊन डायरेक्ट झोपायचो पण आई बाबा मला कायम भेटायला शिवाजी पार्कला भेटायला यायचे, असंही सचिन (Sachin Tendulkar) म्हणाला.





इतर महत्वाच्या बातम्या  


बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप