लंडनः सामना कसा जिंकतात हे खेळाडूंना शिकवणारा महान प्रशिक्षक भारताला लाभला आहे, अशा शब्दात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळेचं अभिनंदन केलं.

 

माजी कर्णधार सौरव गांगुली आणि भारताचे माजी प्रशिक्षक यांचा वाद हा क्रिकेट सल्लागार समितीचा एक भाग होता. मात्र कुंबळे सारख्या महान फलंदाजाला मुख्य प्रशिक्षकपदी संधी देण्यात आली आहे, असं बोलून सचिनने गांगुली आणि शास्त्री यांच्या वादावर मौन सोडलं.

 

..म्हणून कुंबळेला संधी दिली

कुंबळेची स्तुती करताना सचिनला शास्त्रींच्या प्रश्नावर पुन्हा विचारणा करण्यात आली. बैठकीत शास्त्री यांच्याबद्दल जो निर्णय घेण्यात आला, ती गोपनीय माहिती आहे. त्यामुळे ती सांगणं योग्य नाही. मात्र शास्त्री यांनी गेल्या 17 महिन्यात भारतीय संघाला दिलेलं योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे, असं सचिनने सांगितलं.

 

अनिल कुंबळेकडं क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. युवा खेळाडूंना खूप काही शिकायला मिळेल. त्यामुळे कुंबळेला प्रशिक्षकपदी नेमण्याचा भारतीय संघाला मोठा फायदा होईल, असं सचिनने सांगितलं.

 

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि संजय जगदाळे हे प्रशिक्षकपद निवडीसाठी अर्जदारांची मुलाखत घेतली होती. त्यामुळे गांगुलीने मुलाखतीत प्रश्नच विचारला नाही, असा आरोप शास्त्री यांनी केला होता. तेव्हापासून गांगुली आणि शास्त्री यांच्यातील वाद वाढला होता.