नवी दिल्लीः भारताचा स्टार गोल्फ खेळाडू अनिर्बान लाहिरी आणि एस.एस.पी चौरसिया पुढच्या महिन्यात होत असलेल्या रिओ आलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. आदिती अशोक देखील महिला गोल्फ स्पर्धेत रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे.
ऑलिम्पिकमध्ये जवळपास 112 वर्षानंतर भारताचे खेळाडू पात्र ठरले आहेत. भारतीय गोल्फ संघाने सोमवारी ही घोषणा केली. पुढच्या महिन्यात होत असलेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये गोल्फ पात्रतेच्या फेरीची अंतिम तारीख 11 जुलै ठेवण्यात आली होती.
अनिर्बान लाहिरी
अनिर्बान लाहिरी आणि चौरसिया हे आंतरराष्ट्रीय गोल्फ महासंघातील रँकिंगच्या आधारावर पात्र ठरले आहेत. गोल्फ महासंघ म्हणजेच आयजीएफने जाहीर केलेल्या यादीत लाहिडी 20 आणि चौरसिया 45 व्या क्रमांकावर आहेत.
एसएसपी चौरसिया
भारताचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी महिला शिलेदार देखील सज्ज झाली आहे. आदिती अशोक रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकावण्यासाठी सज्ज झाली आहे.