Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाड ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. ऋतुराजने भारतीय दिग्गजांसह जगभरातील दिग्गजांनाही मागे टाकलं आहे. ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 टी-20 सामन्यांमध्ये 55.75 च्या सरासरीने आणि 159.29 च्या स्ट्राईक रेटने एकूण 223 धावा केल्या. ज्यामध्ये 123 धावांच्या नाबाद शतकाचाही समावेश आहे. क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या, पण रुतुराजने त्यालाही मागे टाकले आहे. याशिवाय भारताच्या या युवा फलंदाजाने या यादीत विराट कोहली आणि डेव्हन कॉनवे यांनाही मागे टाकले आहे.






ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू



  • ऋतुराज गायकवाड – 223 धावा

  • मार्टिन गप्टिल - 218 धावा

  • विराट कोहली - 199 धावा

  • डेव्हॉन कॉनवे - 192 धावा






भारतासाठी टी-20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज


भारतासाठी एकाच टी-20 मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी केल्यानंतर ऋतुराजही त्याच्या मागे आला आहे. या यादीत विराट कोहलीचे नाव आघाडीवर असून त्यानंतर केएल राहुल आणि त्यानंतर ऋतुराज गायकवाडचा क्रमांक लागतो. या तिन्ही खेळाडूंनी 5 सामन्यांच्या T20 मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.



  • विराट कोहली - इंग्लंडविरुद्ध 231 धावा

  • केएल राहुल - न्यूझीलंड विरुद्ध 224 धावा

  • रुतुराज गायकवाड - 223 वि. ऑस्ट्रेलिया






T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 4 हजार धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज 


या सर्व विक्रमांशिवाय ऋतुराज गायकवाडने आणखी एक विक्रम केला आहे. सर्व T20 फॉरमॅटमध्ये एकत्रितपणे 4000 धावा पूर्ण करणारा तो सर्वात जलद भारतीय फलंदाज बनला आहे. या 26 वर्षीय खेळाडूने T20 क्रिकेटमध्ये एकूण 122 सामने खेळले आहेत. त्याने या सामन्यांच्या 117 डावांमध्ये 38.42 च्या सरासरीने आणि 138.89 च्या स्ट्राईक रेटने एकूण 4035 धावा केल्या आहेत. या कालावधीत रुतुराजने 5 शतके आणि 27 अर्धशतके झळकावली आहेत, तर त्याची सर्वोत्तम खेळी नाबाद 123 धावांची आहे, जी त्याने या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली होती.






इतर महत्वाच्या बातम्या