Ananya Panday on Rohit Sharma : बाॅलिवूड आणि क्रिकेटच्या दुनियेतील कनेक्शन काही नवीन नाहीत. मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर ते पार आता किंग विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अशी न संपणारी यादी आहे. अनेक क्रिकेटपटूंचे नाव अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे बाॅलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेला क्रिकेटशी निगडीत प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी तिनं दिलेल्या बिनधास्त उत्तरांची सोशल मीडियात चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिने आपली बिनधास्त मते मांडली.
"तुला कोणत्या क्रिकेटरला DM करायला आवडेल?" अनन्या पांडे म्हणते...
JioCinema वर तिचा आगामी चित्रपट 'खो गये हम कहाँ' च्या प्रमोशन दरम्यान, अनन्याला तिच्या पसंतीच्या क्रिकेटपटूबद्दल आणि तिला कोणाशी नेक्ट व्हायला आवडेल? असे विचारण्यात आले. यावेळी 'स्टुडंट ऑफ द इयर 2', 'पति पत्नी और वो' आणि 'ड्रीम गर्ल 2' सारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये तिच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या अनन्याने बिनधास्त उत्तर दिले. स्मितहास्य करत अनन्या म्हणाली की, “मी रोहित शर्माला डीएम करेन. तो खरोखरच जबरदस्त कॅप्टन आहे. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे चांगले नेतृत्व केले, मी त्याला धन्यवाद म्हणेन.” अनन्याच्या बिनधास्त उत्तराने सोशल मीडियावर खळबळ उडाली. चाहते सुद्धा सोशल मीडियात व्यक्त होऊ लागले.
कोहलीबद्दल काय म्हणाली?
अनन्याने यावेळी बोलताना कोहलीबद्दल सुद्धा मत व्यक्त केले. ती म्हणाली की, “विराट कोहली हा GOAT (सार्वकालिक महान खेळाडू) आहे. तो खेळाबद्दल खूप उत्साही आहे. सामन्यादरम्यान तो अनुष्काशी ज्या प्रकारे संवाद साधतो ते मला खूप आवडते.”
हिटमॅन रोहित म्हणाला, एकदाच काय तो निर्णय घ्या
दुसरीकडे, कोहलीने थेट दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वनडे आणि टी-20 खेळण्यास नकार दिल्यानंतर रोहितने तोच निर्णय घेतला आहे. तथापि, कसोटी संघात दोघेही असून कॅप्टन रोहित असेल. मात्र, वनडे आणि टी-20 संघात रोहित आणि विराट असेल की नाही? याची चर्चा रंगली आहे. रोहित शर्माचे कर्णधारपदही चर्चेत आहे. आता भारतीय संघाला पुढील आयसीसी स्पर्धा 2024 मध्ये T20 विश्वचषकाच्या रूपाने खेळायची आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या मनात कर्णधारपदाचा प्रश्न निर्माण होत आहे. रोहित शर्माला पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेसाठी भारताचे कर्णधारपद दिले जाईल की नाही? याची चर्चा रंगली आहे. टी-20 वर्ल्डकपसाठी कर्णधारपदाबद्दल बीसीसीआयने ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी रोहित शर्माची इच्छा होती. यानंतर BCCI ने रोहित शर्मा T20 WC मध्ये कर्णधार असेल, असा निर्णय घेत चर्चांना पूर्णविराम दिला.
इतर महत्वाच्या बातम्या