इंग्लंडमध्ये 1 जूनपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचा उपकर्णधार असल्याची चर्चा आहे. ‘डेक्कन क्रोनिकल’ला बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
बीसीसीआयकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. गेल्या काही वर्षांपासून उपकर्णधारपदाची माहिती अधिकृतपणे जाहीर केली जात नाही. त्यामुळे रोहित शर्माला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्याची आल्याची माहितीही अधिकृतपणे देण्यात आली नसावी, असा अंदाज लावला जात आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत कर्णधार विराट कोहली काही कारणास्तव खेळू न शकल्यास टीम इंडियाची सुत्रे रोहित शर्माकडे असतील, असं डेक्कन क्रोनिकलच्या वृत्तात म्हटलं आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 8 संघ सहभागी होणार आहेत. दोन गटांमध्ये संघांचं विभाजन करण्यात आलं आहे.
पहिल्या गटामध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. सर्व संघ प्रत्येकी 3 सामने खेळतील आणि गटातील वरील दोन संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील.
- ग्रुप ए : ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, न्यूझीलंड
- ग्रुप बी : भारत, पाकिस्तान, द. आफ्रिका, श्रीलंका
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी- 2017च्या सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक
- जून 1: इंग्लंड Vs बांगलादेश
- जून 2: ऑस्ट्रेलिया Vs न्यूझीलंड
- जून 3: श्रीलंका Vs दक्षिण अफ्रिका
- जून 4: भारत Vs पाकिस्तान
- जून 5: ऑस्ट्रेलिया Vs बांगलादेश
- जून 6: न्यूझीलंड Vs इंग्लंड
- जून 7: पाकिस्तान Vs दक्षिण अफ्रिका
- जून 8: भारत Vs श्रीलंका
- जून 9: न्यूझीलंड Vs बांगलादेश
- जून 10: इंग्लंड Vs ऑस्ट्रेलिया
- जून 11: भारत Vs दक्षिण अफ्रिका
- जून 12: श्रीलंका Vs पाकिस्तान
- जून 14: पहिली सेमीफाइनल (A1 Vs B2)
- जून 15: दूसरी सेमीफाइनल (A2 Vs B1)
- जून 18: अंतिम सामना
संबंधित बातम्या :