नवी दिल्ली : दहशतवाद्यांना मदत पुरवणारं पाकिस्तान जर आता सुधारलं नाही, तर आणखी कठोर कारवाई करु, असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला दिला आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत नितीन गडकरी बोलत होते.
दगडफेक रोखण्यासाठी काश्मिरी तरुणाला जीपला बांधणाऱ्या मेजर लितुल गोगोई यांचंही यावेळी नितीन गडकरी यांनी भरभरुन कौतुक केलं. गडकरी म्हणाले, “तत्कालीन परिस्थिती पाहून मेजर लितुल गोगोई यांनी घेतलेल्या निर्णयाचं कौतुक करणं गरजेचं आहे.”
यावेळी गडकरींनी केंद्र सरकारच्या तीन वर्षांच्या कामावर बोलताना म्हटलं, अच्छे दिन आले आहेत आणि आणखी अच्छे दिन येतील.
केंद्राच्या तीन वर्षांच्या कार्यकाळाविषयी बोलताना त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या चर्चांवरही मत व्यक्त केले. गडकरी म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार नसतील.”