India Vs Australia World Cup Final : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. एकीकडे भारतीय संघाने यावेळी चांगली कामगिरी करत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे, तर दुसरीकडे रोहित शर्माची बॅटही चांगली धुवाँधार बरसात करत आहे. रोहित शर्मा क्रीझवर येताच गोलंदाजांवर हल्ला करतो, ज्यामुळे विरोधी संघात धडडी भरतेच, पण नंतर येणाऱ्या फलंदाजांनाही वातावरण समजून घेण्यासाठी थोडा वेळ मिळतो. त्यामुळेच शुभमन गिल आणि विराट कोहलीपासून ते केएल राहुल आणि श्रेयस अय्यरपर्यंत सर्वजण नंतर आल्यावर चांगल्या धावा करत आहेत. दरम्यान, अंतिम फेरीत रोहित शर्माची केवळ एक छोटी खेळी त्याला नव्या उंचीवर घेऊन जाईल. विराट कोहलीला सुद्धा मोठ्या विक्रमाची संधी वर्ल्डकपच्या महामुकाबल्यात असेल. 






सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या केन विल्यमसनच्या नावावर


वर्ल्डकपच्या एका मोसमात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या केन विल्यमसनच्या नावावर आहे. कर्णधार म्हणून त्याने 2019 च्या विश्वचषकात 578 धावा केल्या होत्या. रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर त्याने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 550 धावा केल्या आहेत. म्हणजेच 19 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माने आणखी 29 धावा केल्या तर तो केन विल्यमसनला मागे टाकेल. रोहित शर्मा ज्या पद्धतीने खेळतो, त्याच्यासाठी हा आकडा फार मोठा नाही. 29 धावा करून तो विश्वचषकाच्या एकाच मोसमात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनेल.






श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने 2007 मध्ये कर्णधार म्हणून 548 धावा केल्या होत्या. तर 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंग 539 धावा करण्यात यशस्वी ठरला होता. 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने 507 धावांचा आकडा गाठला होता. तर 2015 मध्ये एबी डिव्हिलियर्सने 482 धावा केल्या होत्या. 2003 मध्ये जेव्हा टीम इंडिया विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचली तेव्हा तत्कालीन कर्णधार सौरभ गांगुलीने 465 धावा केल्या होत्या. रोहित शर्माने या सर्वांना मागे टाकले असून आता तो केन विल्यमसनलाही मागे टाकण्यात यशस्वी होतो का हे पाहावे लागेल.


षटकारांचाही विक्रम मोडणार


रोहितला विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी 29 धावांची गरज असतानाच फक्त दोन सिक्स ठोकल्यानंतर आजवर ख्रिस गेलच्या नावावर असलेला सिक्सरचा विक्रम रोहितच्या नावे होईल. 






विराट कोहली मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर 


वर्ल्डकपच्या इतिहासात एकाच मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम किंग कोहलीनं आपल्या नावावर केला आहे. त्यामुळे त्याला आयसीसी स्पर्धेत आणखी एक विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे. फक्त 44 धावा करताच आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये सर्वाधिक धावा आपल्या नावे करेल. 


इतर महत्वाच्या बातम्या