Rohit Sharma Clears Fitness Test: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताचा हिटमॅन रोहित शर्मा फिट असल्याचं बीसीसीआयच्या सूत्रांकडून कळलं आहे. रोहितने बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस चाचणी दिली. यात तो उत्तीर्ण झाल्याची माहिती आहे. त्यामुळं आता रोहित शर्मा लवकरच टीम इंडियात परतेल अशी अपेक्षा आहे. रोहित शर्मा आज सकाळी एनसीएमध्ये फिटनेस टेस्टमधून बाहेर पडला.


रोहितला आता कसोटी संघात सामील होण्यासाठी निवड समितीच्या क्लिअरन्सच्या प्रतीक्षा आहे. मात्र तसं झालं तरी त्याला पहिल्या दोन कसोटीत खेळण्याची संधी मिळू शकणार नाही. कारण नियमांप्रमाणं त्याला 14 दिवसांचा क्वारंटाईन काळ पूर्ण करावा लागणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत मात्र त्याचा समावेश होऊ शकतो. रोहितची ही चाचणी राहुल द्रविडच्या निरीक्षणाखाली बंगळुरुमध्ये पार पडली.


आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली नंबर एकवर कायम आहे तर रोहित शर्मा दुसऱ्या नंबरवर आहे.  विराट 870 गुणांसह एक नंबर एक रोहित 842 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. टी-20 रँकिंगमध्ये केएल राहुल सर्वाधिक रँकिंग असणारा भारतील फलंदाज आहे. राहुलकडे यंदा 816 पॉईंट्स आहेत. तसेच विराट कोहलीचे 697 पॉईंट्स आहेत. भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियाविरोधात खेळवण्यात आलेल्या टी-20 सीरीजमध्ये संघात समावेश नव्हता. त्यामुळे रोहित टॉप-10 मध्ये जागा निर्माण करु शकला नाही.