नवी दिल्ली: रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणारी भारताची पैलवान साक्षी मलिकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केलं आहे.


 

मोदींनी ट्विटरवरुन साक्षीचं कौतुक केलं. 'साक्षी मलिकनं इतिहास रचला आहे. संपूर्ण देश खुष आहे. रक्षाबंधनच्या शुभदिनी भारताच्या मुलीनं पदक जिंकून देशाची मान अभिमानानं उंचावली आहे. आम्हाला साक्षीचा अभिमान आहे.'

 


 

ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतीत पदक जिंकून देणारी साक्षी ही पहिलीच महिला पैलवान ठरली आहे. 23 वर्षीय साक्षीनं कझाकिस्तानच्या आयसुलू टायबेकोवाला 58 किलो वजनी गटात पराभूत करुन कांस्य पदकाची कमाई केली.

 

या स्पर्धेचं सुवर्णपदक जपानच्या कोओरी इकोनं पटकावलं. तर रशियाच्या वालेरिया काबलोवानं रौप्य पदक मिळवलं. काबलोवानंच क्वॉर्टर फायनलमध्ये साक्षीला पराभूत केलं होतं.