पुणे: गेल्या काही महिन्यांपासून फक्त आणि फक्त सैराटवर बोलून आता आपण वैतागल्याची उद्विग्न प्रतिक्रीया दिग्दर्शक नागराज मंजुळेनं व्यक्त केली. आज पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या तिसऱ्या स्मृतीदिना निमित्तानं विवेक लघुपट महोत्सव आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी नागराजनी आपली भावना व्यक्त केली.
विशेष म्हणजे, यावेळी आर्ची उर्फ रिंकू राजगुरुचा राजकीय मंचावर गर्दी खेचण्यासाठी उपयोग होतो का? असा सवाल विचारल्यावर नागराजनं त्याला खोचक उत्तर दिलं.
या महोत्सवात जवळपास 264 लघुपट दाखल झाले आहेत. त्यातील फक्त 40 लघुपट दाखवण्यात येणार आहेत. विवेक लघुपट महोत्सवासाठी आज उमेश कुलकर्णी, जितेंद्र जोशी, हमीद दाभोलकरांसह इतर मान्यवर हजर होते.