Commonwealth Games 2022 : मागील काही काळात भारतात क्रीडा क्षेत्राला अच्छे दिन आले आहेत. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताने ऑलिम्पिक इतिसाहासाती सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्यानंतर बऱ्याच स्पर्धात यश मिळवत थॉमस कप (Thomas Cup) देखील जिंकला. आता कॉमनवेल्थ गेम्स 2022 (CommonWealth Games 2022) ही जागतिक क्रीडा स्पर्धा सुरु असून याच दरम्यान रिलायन्स उद्योगसमुहाने (Reliance) भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांना सोयीसुविधा वाढवण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनसोबत (Indian Olympic Association) भागिदारी जाहीर केली आहे. ज्यामुळे आगामी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये (Paris Olympic 2024) प्रथमच इंडिया हाऊसची स्थापना करण्यात येणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार रिलायन्स इंडस्ट्रीस लिमिटेड कंपनीने (Reliance Industries Limited) भारतीय खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनसोबत भागिदारी जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी भव्य स्पर्धांमध्ये रिलायन्स भारतीय खेळाडूंना मदत करणार आहे. यामध्ये आगामी कॉमनवेल्थ खेळांसह आशियाई गेम्स आणि ऑलिम्पिक खेळांचाही समावेश आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची सदस्य असणाऱ्या नीता अंबानी यांनी भारताला जागतिक क्रिडा क्षेत्रात उच्च स्तरावर नेणं आमचं स्वप्न असल्याचं म्हटलं. ही भागिदारी यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे.
IOA ने मानले आभार
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन अर्थात IOA चे महासचिव राजीव मेहता म्हणाले, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि नीता अंबानी यांनी भारतीय ओलिम्पिक असोसिएशनसोबत भागिदारी करुन भारतात खेळांचे समर्थन करुन भविष्यातील खेळाडूंसाठी उचलेल्या या महत्त्वाच्या पाऊलाबद्दल मी त्यांचं धन्यवाद करतो. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इंडिया हाउस असणं एक मोठी गोष्ट असून याचा भारतीय खेळाडूंना फायदा होईल.
हे देखील वाचा -