RCB vs SRH: आयपीएल 2020 च्या 52 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा पाच गडी राखून पराभव केला. या मोसमातील हैदराबादचा हा सहावा विजय असून पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या सामन्यात आरसीबीने 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 120 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल हैदराबादने 14.1 षटकांत पाच गडी राखून सहज लक्ष्य साध्य केलं.
तत्पूर्वी, हैदराबादने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. तिसर्याचं षटकात 13 धावसंख्या असताना सलामीवीर देवदत्त पडिकल 8 चेंडूत 5 धावांवर बाद झाला. त्याला संदीप शर्माने बोल्ड केलं. यानंतर कर्णधार विराट कोहलीही पाचव्या षटकात अवघ्या 7 धावा करून पव्हेलियनमध्ये परतला. तोही संदीप शर्माची शिकार झाला.
28 धावांत 2 गडी तंबूत परतल्यानंतर जोश फिलिप आणि एबी डिव्हिलियर्स यांनी तिसर्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. मात्र, डिव्हिलियर्स शाहाबाज नदीमच्या चेंडूवर बाद झाला. त्याने 24 चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 24 धावा केल्या. डिव्हिलियर्स बाद झाल्यानंतर फिलिपही पव्हेलियनमध्ये परतला. त्याने 31 चेंडूत 32 धावा केल्या.
ठराविक अंतराने हे दोघे बाद झाल्यानंतर आरसीबीची घसरण सुरु झाली. त्यानंतर ख्रिस मॉरिस 3 आणि इसुरु उडाना 0 धावांवर परतले. गुरकीरत सिंग 15 धावा करून नाबाद राहिला. पण त्याने खूप हळू फलंदाजी केली. गुरकीरतने 62.50 च्या स्ट्राइक रेटने धावा जमवल्या.
IPL 2020, MIvsDC : मुंबईचा दिल्लीविरुद्ध 9 विकेट्सनी दणदणीत विजय
त्याचवेळी सनरायझर्स हैदराबादकडून संदीप शर्माने कमालीची गोलंदाजी केली. त्याने त्याच्या चार षटकांत 20 धावा देऊन दोन बळी घेतले. त्याशिवाय जेसन होल्डरने आपल्या कोट्याच्या चार षटकांत 27 धावा देऊन दोन बळी घेतले. त्याचबरोबर टी नटराजनने चार षटकांत केवळ 11 धावा देऊन एक गडी बाद केला.
त्यानंतर हैदराबादने बंगळुरूच्या 121 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग सुरू केला. दुसर्या षटकात कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 8 धावा केल्या आणि वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर तो बाद झाला. यानंतर मनीष पांडे आणि वृद्धिमान साहाने दुसर्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. पांडे 19 चेंडूत 26 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला.
साहाने 32 चेंडूत 39 धावा केल्या. त्याने 1 चौकार आणि एक षटकार लगावला. हे दोघे बाद झाल्यावर केन विल्यमसन 08 आणि अभिषेक शर्मा 08 स्वस्तात तंबूत परतले. पण शेवटी जेसन होल्डरने 10 चेंडूत नाबाद 26 धावांची खेळी करुन आपल्या संघाला विजय मिळवून दिला. होल्डरने 260.00 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. या दरम्यान त्याच्या फलंदाजीमधून एक चौकार व तीन षटकार लगावले.