Ratan Tata Death: कट्टर देशभक्त आणि समाजसेवेचा आदर्श जगासमोर उभे करणारे उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त येताच राजकीय नेत्यांपासून, मनोरंजन, क्रीडाविश्वातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. तर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी रतन टाटांचे अंतिम दर्शन घेतले. 






क्रीडाविश्वातून रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग, शिखर धवन, इरफान पठाण, सुरेश रैना, मोहम्मद शमी, दिनेश कार्तिक, ऑलिम्पिकपटू नीरज चोप्रा यांनी ट्विट करत सोशल मीडियाद्वारे रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.















































रतन टाटा यांचा मृत्यू कशामुळे?


रतन टाटा यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक होती. त्यामुळे मुंबईतील ब्रीड कँडी रुग्णालयात रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु होते. रतन टाटा यांना सोमवारी (7 ऑक्टोबर) रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजताच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अचानक रक्तदाब कमी झाल्यामुळे रतन टाटा यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. 


संबंधित बातमी:


Ratan Tata Death: रतन टाटा यांच्या मृत्यूचं नेमकं कारण आलं समोर; द्रष्टा, दानशूर, दयाळू, दिलदार, देशप्रमी हरपला, संपूर्ण देश हळहळला!