PV Sindhu Marriage Date : भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूच्या (PV Sindhu) चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पीव्ही सिंधू लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या 22 डिसेंबर रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे होणार आहे. व्यकंट दत्ता असं पीव्ही सिंधुच्या होणाऱ्या नवऱ्याच नाव असून तो रिष्ठ आयटी व्यावसायिक आणि पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचा कार्यकारी संचालक आहे. 


पीव्ही सिंधूचे वडील पीव्ही रमणा यांनी सांगितले की, दोन्ही कुटुंबे एकमेकांना आधीच ओळखत होते, परंतु एक महिन्यापूर्वीच लग्नाची बोलणी झाली. त्यांनी पीटीआयला सांगितले की, “सिंधूचे जानेवारीपासून बॅडमिंटनचे खूप व्यस्त वेळापत्रक असेल, त्यामुळे डिसेंबर लग्नासाठी योग्य महिना आहे. 22 डिसेंबरला उदयपूरमध्ये लग्न होणार असून 24 डिसेंबरला हैदराबादमध्ये रिसेप्शन होणार आहे. यानंतर सिंधू तिच्या प्रशिक्षणासाठी परतणार आहे. 


कोण आहे व्यंकट दत्ता साई?


व्यंकट दत्ता साई हा Poseidex Technologiesचा कार्यकारी संचालक आहे. त्याचे वडील जी.टी. व्यंकटेश्वर राव हे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि ते भारतीय महसूल सेवेत (IRS) अधिकारी आहेत. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात पीव्ही सिंधूने या कंपनीचा नवीन लोगो लॉन्च केला होता.                                         


व्यंकट दत्ता साईचा व्यावसायिक प्रवास


साईने जेएसडब्ल्यू आणि सोलर ऍपल ॲसेट मॅनेजमेंटमध्ये काम केले आहे. डिसेंबर 2019 पासून, तो Posidex Technologies मध्ये त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. त्याच्या कामात HDFC आणि ICICI सारख्या अनेक मोठ्या बँकांसाठी अनेक योजना तयार करणं ज्यामध्ये जलद कर्ज प्रक्रिया आणि क्रेडिट स्कोअर जुळण्यासारख्या सुविधा प्रदान करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे.  










ही बातमी वाचा : 


Shivam Dube : 6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्याकडूनही जोरदार धुलाई, मुंबईचा धावांचा डोंगर