Singapore Open Pre Quarterfinals : सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत (Singapore Open 2022) भारताची अव्वल दर्जाची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि पुरुष गटात एचएस प्रणॉयने (HS Pranoy) राऊंड ऑफ-16 मध्ये विजय मिळवत थेट उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. दुसरीकडे राऊंड 16 च्याच सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू मिथुन आणि अश्मिता यांना पराभव मिळाल्याने ते स्पर्धेबाहेर गेले आहेत.


भारतासाठी दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने गुरुवारी सिंगापूर ओपनमध्ये महिला एकेरीत व्हिएतनामच्या लिन ग्युयेनला मात दिली. सामन्यात लिनने पहिल्या सेटमध्ये दमदार खेळ करत सिंधूला 21-19 ने मात दिली. पण त्यानंतर सिंधूने दमदार असं पुनरागमन करत पुढील दोन्ही सेट 21-19 आणि 21-18 च्या फरकाने जिंकत सामना आपल्या नावे केला. आता ती थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली असून तिचा सामना चीनच्या हान युईशी होणार आहे.


प्रणॉयचाही रोमहर्षक विजय


भारताचा आघाडीचा पुरुष बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने जगातील चौथ्या क्रमाकांचा पुरुष बॅडमिंटनपटू चाउ टीन चेनला रोमहर्षक सामन्यात मात दिली. चीनी तायपेच्या चाउने प्रणॉयला पहिल्या सेटमध्ये 21-14 च्या मोठ्या फरकाने मात दिली. त्यानंतर दुसरा सेटही प्रणॉय पराभूत होणार असे वाटत असताना 22-20 च्या फरकाने प्रणॉयने सेट जिंकला. ज्यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये प्रणॉयने 21-18 च्या फरकाने चाउला मात देत विजय मिळवला. आता उपांत्यपूर्व फेरीत प्रणॉयचा सामना जपानच्या कोडाई नारकोडा याच्याशी होईल. 


 




मिथुन आणि अश्मिता बाहेर


राऊंड ऑफ-16 मध्ये पुरुष एकेरीच्या सामन्यात मिथुन मंजूनाथ आणि महिला एकेरीत अश्मिताला पराभवाचा सामना करावा लागला. मिथुनला आयर्लंडच्या न्हाट ग्युयेनने 10-21, 21-18, 16-21 च्या फरकाने मात दिली. तर अश्मिताला चीनच्या हान युईने 9-21, 13-21 च्या फरकाने नमवलं. या पराभवामुळे मिथुन आणि अश्मिता दोघेही स्पर्धेबाहेर गेले आहेत.


हे देखील वाचा-