Lionel Messi Covid Positive : फुटबॉलमधील (Football) अव्वल दर्जाचा खेळाडू असणारा अर्जेंटीना संघाचा कर्णधार लिओनल मेस्सी (Lionel Messi) याला कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. मेस्सी खेळत असलेल्या पॅरिस सेंट जर्मन क्लबमधील (PSG) मेस्सीसह चौघांना कोरोनाची बाधा झाली आहे. पीएसजी संघातील मेस्सीसह जुआन बर्नाच, सर्जिओ रिको आणि नथान बीटमाजाला यांना कोरोनाची बाधा झाली आहे. 



नुकताच बार्सिलोना संघातून पीएसजी संघात आलेल्या मेस्सीने मानाचा 'बॅलन डी'ओर हा पुरस्कार सातव्यांदा पटकावला होता. सध्या मेस्सी संघासोबत फ्रेंच कप खेळत असून नुकत्याच झालेल्या सामन्यांतर पीएसजी संघात कोरोनाने शिरकाव केला आहे. खेळाडूंसह काही स्टाफ सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मेस्सीसह संघातील कोरोनाबाधित सध्या विलगीकरणात असून त्यांची योग्य ती काळजी मेडीकल टीम घेत असल्याचं पीसएजी संघानं सांगितलं आहे.



नुकताच जिंकला मानाचा 'बॅलन डी'ओर


34 वर्षांच्या मेस्सीने पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तायानो रोनाल्डो आणि बायर्न म्यूनिखचा स्टार रॉबर्ट लेवानडॉस्कीला मागे टाकत हा अवॉर्ड आपल्या नावे केला होता. मेस्सीनं 2009, 2010, 2011, 2012, 2015 आणि 2019 मध्ये 'बॅलन डी'ओर अवॉर्ड जिंकला होता. मेस्सीनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोनं सर्वाधिक वेळा 'बॅलन डी'ओर आपल्या नावे केलं आहे. रोनाल्डोनं 2008, 2013, 2014, 2016, 2017 मध्ये 'बॅलन डी'ओर आपल्या नावे केला आहे. याव्यतिरिक्त जोहान क्रायफ, माइकल प्लातिनी, मार्को वान बास्टननं 3-3 वेळा आणि फ्रेंच बेकेनबाउर, रोनाल्डो नाजारियो, अल्फ्रेडो डी स्टेफनो, केविन कीगन, कार्ल हेन्ज यांनी प्रत्येकी 2-2 वेळा 'बॅलन डी'ओर पटकावला आहे. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha