Pro Kabaddi League 2021-22: बेंगळुरू येथील शेरेटन ग्रँड व्हाइटफील्ड येथे काल खेळण्यात आलेल्या प्रो कबड्डी लीग सीझन 8 मधील 36 व्या सामन्यात पाटणा (Patna Pirates) आणि तमिळनाडू (Tamil Thalaivas) यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात तामिळनाडूच्या अजिंक्य पवारनं (Ajinkya Pawar) सर्वाधिक रेड पॉइंट मिळवले. तर, पाटणाच्या मोनू गोयतनं (Monu Goyat) 9 रेड पॉईंट्स मिळवले आहेत.


पाटणाविरुद्ध सामन्यात तामिळनाडूचा सुरजीत सिंह हा उत्कृष्ट डिफेंडर ठरला. त्यानं पाटणाच्या चार रेडर्सला बाद केलं. तामिळनाडूचा टाय झालेला हा चौथा सामना आहे. प्रो कबड्डी लीगच्या गुणतालिकेत तामिळनाडू 22 अंकासह चौथ्या स्थानावर आहेत. तर, पाटणाचा संघ 24 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. 


बंगळुरूचा जयपूरवर विजय 
 कालच्या दुसऱ्या सामन्यात बंगळुरूच्या संघानं जयपूरला पराभूत करत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. या सामन्यात पवन सहरावत सर्वाधिक रेड पॉईंट्स मिळवणारा खेळाडू ठरला. तर, जयपूरकडून अर्जुल देशवालनं 12 रेड पॉईंट्स मिळवले. या सामन्यात सुरुवातीपासूनच बंगळुरूच्या संघाचं वर्चस्व पाहायला मिळालं. दुसरीकडं अर्जून सतत दोन्ही संघातील गुणांमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, दुसऱ्या खेळाडूकडून त्याला साथ न मिळल्यानं पहिल्या हाफमध्ये जयपूरचा संघ 20-14 फरकानं पिछाडीवर गेला. 


या सामन्यातील दुसऱ्या हाफमध्ये जयपूरच्या संघानं पवनला रोखण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळं जयपूरचं सामन्यात कम बॅक केलं. परंतु, जयपूरला सामना फिरवता आला नाही. अखेर बंगळुरूच्या संघानं 38-31 च्या फरकानं सामना जिंकला. या सामन्यात बंगळुरूच्या सौरभ नांदलनं 4 तर, जयपूरच्या दीपक सिंहला 3 टॅकल मिळवण्यात यश आले. या विजयासह बंगळुरूचा संघानं गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतलीय. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha