Quinton De Kock's Newborn Baby: भारताविरुद्ध सेंच्युरियन (Centurion) कसोटी सामन्यात पराभव मिळाल्यानंतर दक्षिण आफ्रिकाचा विकेटकीपर फलंदाज क्विंटन डी कॉकने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यावेळी कुटुंबाला अधिक वेळ देण्याकरता हा निर्णय डी कॉकने घेतल्याचं सांगितलं. त्यानंतर नुकतीच त्याला मुलगी झाली आहे. 


क्विंटन आणि त्याची पत्नी साशा (Sasha Hurly) यांनी नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे. डी कॉकने त्याच्या मुलीचं नाव कियारा (Kiara) ठेवलं आहे, डी कॉकने इन्स्टाग्रामवर त्याचा, पत्नीचा आणि मुलीचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. त्याच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.



डी कॉकने नुकतच कसोट क्रिकेटला अलविदा केला असला तरी तो दक्षिण आफ्रिका संघासाठी वनडे आणि टी20 क्रिकेट खेळणार आहे. डी कॉक आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्स संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. सध्या त्याला संघाने रिटेन केलं नसलं तरी नक्कीच लिलावामध्ये त्याला घेतील यात शंका नाही.


डी कॉकची कसोटी कारकिर्द


2014 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध डी कॉकने कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण केलं. या प्रकारात त्याने संघाचा कर्णधार म्हणूनही काम पाहिलं आहे. पण संघाच्या खराब प्रदर्शनामुळे त्याला लवकरच कर्णधारपद सोडावं लागलं. त्याने दक्षिण आफ्रिकेकडून एकूण 54 कसोटी सामने खेळले असून त्यात 38.82 च्या सरासरीने 3 हजार 300 रन केले आहेत. यावेळी त्याने सहा शतकं आणि 22 अर्धशतकं झळकावली असून 141 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha