मुंबई : आजच्या घडीला संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही, पण मुंबईच्या नागरिकांनी गांभीर्यानं नियमांचं पालन करावं असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. गंभीर रुग्णांसाठी 22 हजारांचे बेड्स राखीव ठेवले आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी देखील काही बेड्स राखीव ठेवले आहेत. मात्र, सध्या बाधित असलेल्या रुग्णांना लक्षणे दिसत नाहीत. सध्या रुग्णालयात 1 हजार 170 रुग्ण आहेत. रुग्णांची टक्केवारी वाढली तर निर्बंध वाढवावे लागतील. घाबरण्यापेक्षा काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे या संकटापासून जनतेला कसे वाचवता येईल याचाच विचार करत आहेत. यासाठी ते तज्ञांशी, अधिकाऱ्यांशी चर्चा करत असल्याचे पेडणेकर यांनी केले. संपूर्ण लॉकडाऊन नक्कीच होणार नाही, मात्र काही नागरिक बेफिकीरीनं वागत राहिले तर संकटाला तोंड द्यावं लागणार आहे. त्यासाठी निर्बंधात वाढ करावी लागले असेही त्या म्हणाल्या. सध्या डॉक्टर, बेस्ट कर्मचारी बाधित होत आहेत. सध्या बेड्स रिकामे आहेत, त्यामुळे काही निर्णय घेत नाही आहोत असे त्या म्हणाल्या.
आज 7 वाजेपर्यंत निर्णय होणार
आज मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. धोक्याची पातळी ओलांडताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईतील निर्बंधाबाबत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय जाहीर करतील, असे महापौर पेडणेकर यांनी सांगितले. वाढत्या रुग्णसंख्येमुळे मिनी लॉकडाऊन लावणे परवडणार आहे. कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी निर्बंध कडक करावे लागतील असे पेडणेकर यांनी सांगितले. दरम्यान, बाधित रुग्णांसाठी यंत्रणा सज्ज असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
दरम्यान, धारावीसोबतच के इस्ट, के वेस्ट, हायराईजमधून मोठी रुग्णवाढ होत आहे. लोकलमध्येही मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम आणि वेळेत बदल करणं पर्याय असल्याचे त्या म्हणाल्या. सेल्फ टेस्ट विक्री जे कोणी करत आहेत ते स्वत:ला फसवत आहेत. नागरिकांना कळायला पाहिजे की, अशा टेस्ट केल्या तर त्या परफेक्ट नसतात असे त्या म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या: