Ind vs SA, 2nd Test Highlights: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये दमदार कामगिरी करत सामना 7 विकेट्सनी जिंकला आहे. यावेळी आफ्रिकेच्या डीन एल्गर याने शेवटच्या डावात केलेल्या नाबाद 96 धावा महत्त्वपूर्ण ठरल्या.



सामन्यात सर्वात आधी भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली पण केएल राहुल आणि आर आश्विन सोडता एकाही खेळाडूला खास कामगिरी करता न आल्याने भारताचा डाव 202 धावांवर आटोपला आहे. यावेळी राहुलने 50 तर आश्विनने 46 धावा झळकावल्या ज्यामुळे भारताचा डाव 200 पार गेला. 202 धावांवर पहिला डाव आटोपल्यानंतर भारताने गोलंदाजीला सुरुवात केली. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या पीटरसन (62) आणि बावुमा (51) यांच्या मदतीने आफ्रिकेने 229 धावा केल्य़ा. भारताला 27 धावांची पिछाडी मिळाली. तेव्हा भारताकडून रहाणे (58) आणि पुजारा (53) यांनी अर्धशतकं झळकावली. तर विहारीने 40 धावा केल्याने भारताने 266 धावा करत आफ्रिकेला विजय़ासाठी 240 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान एल्गारच्या नाबाद 96 धावांनी आफ्रिकेने 67.4 ओव्हरमध्ये पार करत सामना 7 विकेट्सनी जिंकला. या विजयासह आफ्रिकेने मालिकेतही 1-1 बरोबरी घेतली आहे.  


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha