Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डी लीगच्या 27व्या सामन्यात पुणेरी पलटननं तेलगू टायटन्सचा (Telugu Titans vs Puneri Paltan) 26-25नं पराभव केला. अखेरच्या रेडपर्यंत रोमांचक ठरलेल्या या सामन्यात तेलुगू टायटन्सच्या एका चुकीचा फायदा पुणेरी पटलननं घेतला. हा पुणेरी पलटनचा सलग दुसरा विजय ठरलाय. तर, तेलुगू टायटन्सला या हंगातील चौथ्या पराभवाला सामारे जावा लागलं. या सामन्यात पुण्याच्या संघानं काही खास कामगिरी केली नाही. परंतु, तेलुगू टायटन्सच्या अनावश्यक चुकांमुळं सामन्याचा निकाल पुण्याच्या बाजूनं लागला.
ट्वीट-
पहिल्या हाफमध्ये संथ सुरुवात
या सामन्यात दोन्ही संघानं संथ सुरुवात केली आणि डू ओर डायवर खेळण्याचा निर्णय घेतला. अस्लम इनामदारच्या खराब फॉर्मनं पुण्यासाठी चिंतेचा विषय ठरत होता. तर, तेलुगू टायटन्सनं सिद्धार्थ देसाईला पहिल्या सातमध्ये जागा दिली नाही. मोनू गोयतला चार रेड करूनही खात उघडता आलं नाही. हाफ टाईमपर्यंत पुणेरी पटलननं सामन्यात 11-9 अशी आघाडी घेतली. दरम्यान, अस्लम इनामदार सातत्यानं संघर्ष करताना दिसला. पाच रेडमध्ये त्याला केवळ एकच गुण मळवता आला. तर, मोहित गोयतनं चार गुण मिळवून संघासाठी चांगली कामगिरी कामगिरी केली. टायटन्सनं 16व्या मिनिटाला मॅटवर पाठवलं आणि त्यानं पाच रेडमध्ये आऊट न होता तीन गुण प्राप्त केले.
अखेरच्या रेडमध्ये पुण्याचा विजय
दुसऱ्या हाफमध्ये पुण्याच्या संघानं आणखी गुण मिळवले. दुसऱ्या हाफच्या तिसऱ्या मिनिटाला पुण्याच्या संघानं पाच गुणांची आघाडी घेतली.ऑलआऊट झाल्यानंतर सिद्धार्थनं रेड टाकत आपल्या संघाचं दोन गुणांचं अंतर कमी केलं. सिद्धार्थशिवाय इतर खेळाडूंकडून गुण न मिळाल्यानं टायटन्स सलग पाच गुणांनी पिछाडीवर होता. 15व्या मिनिटाला विनयनं सुपर रेड टाकत गुणांत बरोबरी साधली. शेवटच्या रेडपर्यंत स्कोअर बरोबरीत होता. ही रेड पुण्याच्या संघासाठी करो या मरोची होती. परंतु, मोनू गोयतने चूक करत अस्लमला रेड पॉइंट दिला आणि सामन्याचा निकाल पुण्याच्या बाजूनं लागला.
हे देखील वाचा-