Rudraksh Patil : महाराष्ट्राचा सुपुत्र रुद्रांक्ष पाटील याने (Rudraksh Patil) याने ऑलिम्पियन ऐश्वर्या प्रतापसिंग तोमर हिला 16-6 च्या फरकाने मात देत एमपी स्टेट नेमबाजी अकादमी श्रेणीतील 10 मीटर एअर रायफल T6 राष्ट्रीय नेमबाजी निवड चाचणी जिंकली आहे. रुद्राक्ष आणि ऐश्वर्या यांनी आठ जणांच्या उपांत्य फेरीत अनुक्रमे 261.9 आणि 261.3 गुणांसह पहिले आणि दुसरे स्थान पटकावले. त्यापूर्वी, 392-मजबूत पात्रता झोनमध्ये, रुद्राक्षने 630.2 गुण मिळवून एअर आर्मीच्या रवी कुमारच्या मागोमाग दुसरे स्थान पटकावले. रवीने 630.7 गुणांनी फेरी जिंकली तर ऐश्वर्या यावेळी 629.4 गुणांसह चौथ्या स्थानावर राहिली.
याशिवाय राजस्थानच्या यशवर्धन यानेही कमाल कामगिरी केली. रुद्राक्ष पाठोपाठ त्यानेही चमकदार खेळ दाखवला. ज्युनियर पुरुष आणि युवा पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल T6 चाचण् यशवर्धनने जिंकल्या. ज्युनियर पुरुष स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने रुद्राक्षचा 17-7 सा पराभव केला, तर युवा वर्गात त्याने आंध्रप्रदेशच्या मद्दिनी उमामहेशचा 17-15 असा पराभव केला. दिल्लीतील डॉ. करणी सिंह शूटिंग रेंजमध्ये, हरियाणाच्या कशिश मेहराने पुरुषांच्या 25 मीटर सेंटर फायर पिस्तूल T5 ट्रायलमध्ये एकूण 587 गुणांसह विजय मिळवला.
जर्मनीत रुद्राक्षची सुवर्णपदकाला गवसणी
रुद्राक्ष हा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा धाकटा मुलगा असून त्याने याआधी देखील 10 मीटर रायफल शूटिंग या प्रकारात चांगली कामगिरी केली आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी जर्मनीमधील सेहूल येथे झालेल्या आयएएसएस कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी पार पडली होती. या स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रुद्राक्षने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्याचे हे या स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक होते. भारताने त्याआधी स्पर्धेत 8 सुवर्णपदके जिंकली होती. अंतिम टप्प्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करून नंतर झालेल्या सुवर्णपदकाच्या लढतीत ही आपली छाप रुद्राक्ष याने यावेळी सोडली.
रुद्राक्षला कुटुंबाची साथ
देशात एकीकडे सर्वांना क्रिकेटनं वेड लावलं असताना रुद्राक्षने वेगळ्या वाटेने जात रायफल शूटींगमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे. दरम्यान या सर्वामध्ये रुद्राक्षच्या परिवाराने त्याला खूप सपोर्ट केला. रुद्राक्षचे वडील बाळासाहेब पाटील हे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. सध्या त्यांच्याकडे पालघर पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार आहे. तर आई हेमांगिनी पाटील या परिवहन विभागात नवी मुंबई वाशी येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.
हे देखील वाचा-