पुणे : पुण्याच्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं आणि मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन मोठ्या भक्तीमय वातावरणात करण्यात आलं आहे. आज संध्याकाळी 4.15 वाजता कसबा गणपतीचं विसर्जन करण्यात आलं आहे. त्यानंतर मानाच्या दुसऱ्या म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणेशाचं विसर्जन 5.40 वाजता करण्यात आलं. यावेळी लेझिम अन् ढोल-ताशाच्या गजरात अवघं पुणे दुमदुमल्याचं दिसून आलं. 

Continues below advertisement

पुणे पालिकेने बांधलेल्या डेक्कन येथील हौदात या मानाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात येत आहे. पुण्यातील मानाचे समजले जाणारे पाच गणपती मंडळ म्हणजे श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती. या गणपतींच्या विसर्जनाचा कार्यक्रम क्रमाने आखण्यात आला आहे. 

पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जनाची मिरवणूक सकाळी 11.20 वाजता सुरू झाली. बेलबाग चौकातून सुरू झालेली ही विसर्जनाची मिरवणूक नंतर लक्ष्मी रोड, अलका टॉकीज आणि डेक्कन अशी झाली. बेलबाग चौकात 11.20 वाजता सुरू झालेली मिरवणूक ही अलका चौकात 3.15 मिनीटांनी आली. त्यानंतर डेक्कन या ठिकाणी 4.15 वाजता विसर्जन करण्यात आलं.

Continues below advertisement

मानाच्या गणपतीचे विसर्जन वेळ 

कसबा गणपतीबेलबाग चौक - 11:20अलका चौक - 3:15विसर्जन - 4:15

तांबडी जोगेश्वरीबेलबाग चौक - 11:55 अलका चौक - 4:45विसर्जन - 5:38