मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू इमाम उल हकने पदार्पण केलं. पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या या ओपनरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. इमामचं कौतुक करणाऱ्या एका महिला अँकरला 'आंटी' म्हणत त्याने तिची विकेटच घेतली आहे.
अबुधाबीमध्ये 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून पाकिस्तानी सलामीवीर इमाम उल हकने डेब्यू केला. 21 वर्षीय 'चष्मिश' फलंदाजावर अनेक महिला चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. इमामला ट्विटरवरुन शुभेच्छा देणाऱ्या एका महिला स्पोर्ट्स अँकरला त्याने क्लीन बोल्डच केलं.
पीटीव्ही स्पोर्ट्सची आघाडीची अँकर फझीला सबाने इमामचं ट्विटरवरुन कौतुक केलं. 'पदार्पणातच शतक. वाह काय कामगिरी आहे इमाम उल हक' असं ट्वीट तिने केलं. यावर इमामने 'धन्यवाद फझीला आंटी' असं उत्तर देत सर्वत चाहत्यांना चक्रावून टाकलं.
https://twitter.com/ImamUlHaq12/status/921491258094358528
खुद्द फझीलानेही आश्चर्य व्यक्त करणारे इमोजी रिप्लाय म्हणून पोस्ट केले. दोघांचं संभाषण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं होतं. त्यानंतर फझीलाने दोघांचा फोटो ट्वीट करत 'आंटीकडून अभिनंदन' असं म्हणत या प्रकरणावर पडदा टाकला आहे.
https://twitter.com/FazeelaSaba1/status/922464185082089472
वनडेमध्ये पदार्पणातच शतक ठोकणारा इमाम हा दुसराच पाकिस्तानी, तर तेरावा क्रिकेटपटू ठरला आहे. पहिल्याच सामन्यातील चमकदार खेळीमुळे त्याला उर्वरित सामन्यांमध्येही स्थान मिळालं. वनडे मालिकेत पाकने श्रीलंकाला 5-0 ने व्हाईट वॉश दिला.
थँक्यू आंटी, पाकिस्तानी क्रिकेटपटूकडून स्पोर्ट्स अँकरची विकेट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Oct 2017 04:08 PM (IST)
'पदार्पणातच शतक. वाह काय कामगिरी आहे इमाम उल हक' असं ट्वीट तिने केलं. यावर इमामने 'धन्यवाद फझीला आंटी' असं उत्तर देत सर्वत चाहत्यांना चक्रावून टाकलं.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -