वन डेत सर्वात जलद एक हजार धावा, फखर झमानचा विक्रम
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
22 Jul 2018 10:42 PM (IST)
पाकिस्तान आणि झिम्बाब्वे संघांदरम्यान सध्या वन डे मालिका सुरु आहे. या मालिकेतल्या बुलावायो इथं झालेल्या पाचव्या सामन्यात झमाननं 20वी धाव घेत वन डेतल्या एक हजार धावा पूर्ण केल्या.
NEXT
PREV
बुलावायो (झिम्बाब्वे) : पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमाननं वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद एक हजार धावा करण्याचा मान मिळवला आहे. त्यानं वन डेत 18 डावांमध्ये हा एक हजार धावांचा विक्रमी टप्पा गाठला आहे.

या कामगिरीमुळे झमाननं सर व्हिवियन रिचर्ड्स, केविन पीटरसन, जोनाथन ट्रॉट, क्विन्टन डी कॉक आणि बाबर आझम या फलंदाजांना मागे टाकलंय. या सर्वांनी वन डे क्रिकेटमध्ये 21 डावांत एक हजार धावांचा टप्पा ओलांडला होता.
वन डेत जलद एक हजार धावा करणारे टॉप टेन फलंदाज
1) फखर झमान ( पाकिस्तान ) - 18 डाव
2)सर व्हिवियन रिचर्डस ( वेस्ट इंडिज ) - 21 डाव
3) केविन पीटरसन ( इंग्लंड ) - 21 डाव
4) जोनाथन ट्रॉट ( इंग्लंड ) - 21 डाव
5) क्विन्टन डी कॉक ( दक्षिण आफ्रिका ) - 21 डाव
6) बाबर आझम ( पाकिस्तान ) - 21 डाव
7) गॉर्डन ग्रिनिज ( वेस्ट इंडिज ) - 23 डाव
8) रायन डॉस्चेट ( नेदरलँड ) - 23 डाव
9) अझर अली ( पाकिस्तान ) - 23 डाव
10) ग्लेन टर्नर ( न्यूझीलंड ) - 24 डाव

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -