भारतीय फलंदाजांसाठी पाक गोलंदाजांची शक्कल
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय फलंदाजांसाठी पाकिस्तानी गोलंदाज मैदानात सराव करताना पिचवर पांढऱ्या रंगाचं मार्किंग करुन गोलंदाजीचा सराव करत आहेत.
भारतावर विजय मिळवण्यासाठी पाकिस्तानचा संघ आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल. पण भारतीय संघाला हा सामना रणनितीपेक्षा विचार करुन खेळावा लागेल. कारण जो संघ दबाबातही उत्तम खेळ करेल, त्याचा विजय निश्चित आहे.
पाकिस्तानचे जलदगती गोलंदाज पहिल्या दोन मार्क केलेल्या जागेवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
वास्तविक, शॉट पीच चेंडूची भारतीय गोलंदाजांना भीती नाही. पण तिसरे मार्किंग हे विकेटच्या एकदम जवळ असल्याने, पाकिस्तानचे फिरकी गोलंदाज त्या मार्किंगवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतील.
पण भारतीय फलंदाज असे चक्रव्यूह भेदण्यात नेहमीच यशस्वी होतात. आणि त्यासाठी भारतीय फलंदाज त्याअनुषंगाने तयारी करत आहेत.
पाकिस्तानच्या व्यूहरचनेचे फोटो माझाच्या हाती लागले असून, या सामन्यासाठी पाकिस्तानच्या गोलंदाजांनी खास प्लॅन तयार केला आहे.
या सामन्यासाठी पाकिस्तानच्या गोलंदाजांनी व्यूहरचना केली आहे. पाकिस्तानच्या या व्यूहरचनेचा पेपर लिक झाला आहे.
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला होत आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी तीन वाजता सुरु होईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -