पॅरिस : भारताची पैलवान विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिला 50 किलो वजनी गटातून 100 ग्रॅम वजन अधिक असल्यानं निलंबित करण्यात आलं. अंतिम फेरीत धडक देणारी विनेश फोगाट स्पर्धेतून निलंबित झाल्यानं भारतातील क्रीडा चाहत्यांना धक्का बसला. या संपूर्ण प्रकरणावर विनेश फोगाटची प्रतिक्रिया समोर आली आहे. "हा सर्व खेळाचा भाग होता", असं विनेश फोगटनं म्हटलं आहे. विनेश फोगाटनं (Vinesh Phogat First Comment) ही प्रतिक्रिया  भारतीय प्रशिक्षकांसमोर व्यक्त केली आहे. 


महिला संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक विरेंदर दहिया आणि मनजीत राणी यांनी विनेश फोगाटची भेट घेतली. विनेश फोगाटनं जपानच्या यूई सुसाकी आणि यूक्रेनच्या ओकासाना लिवाच ला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता तर, उपांत्य फेरीत वाय. गुझमान लोपेझ हिला पराभूत करत अंतिम फेरीत धडक दिली होती. 


विनेश फोगाटनं अंतिम फेरीत धडक दिल्यानं तिचं एक पदक निश्चित झालं होतं. यामुळं देशभरात विनेशच्या पदक विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी तयारी सुरु झाली होती. मात्र विनेश फोगाट ला निलंबित करण्यात आलं देशातील क्रीडा प्रेमींना धक्का बसला. विनेश फोगाटच्या वजनाची चाचणी करण्यात आली तेव्हा तिचं वजन 50 किलोपेक्षा अधिक भरल्यानं निलंबनाची कारवाई करण्यात आली. 



विनेश फोगाटच्या निलंबनाची बातमी समजात कुस्ती विश्व आणि भारतातील क्रीडा प्रेमींना धक्का बसला . विरेंदर दहिया यांनी आम्ही विनेश फोगाट हिला भेटलो आणि तिचं समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला. ती धाडसी आहे, तिनं आम्हाला सांगितलं हे हार्ड लक असून आपण पदक मिळवण्यात अपयशी ठरलो, मात्र हा खेळाचा भाग होता.   


भारतीय ऑलिम्पिक संघाच्या काही अधिकाऱ्यांनी देखील विनेश फोगाटची भेट घेतली. 


दुसरीकडे भारताची 53 किलो वजनी गटातील कुस्तीपटू अंतिम पंघाल पहिल्याच फेरीत बाहेर पडली.  अंतिम पंघाल तिचा खेळ करु शकली नाही. तिनं तिच्या क्रीडा प्रकारात लक्ष दिलं नाही, असं पंघालच्या प्रशिक्षकांनी म्हटलं. 


संबंधित बातम्या :


'तू लखलखणारं सोनं, तूच भारताची प्रेरणा'  विनेश फोगाटसाठी आलिया, तेजस्विनीसह सेलिब्रेटी मैदानात! 

Vinesh Phogat : एक ग्रँम वजन सुद्धा सुवर्णसंधी गमावू शकते, 100 ग्रँम वजन कमी झालं नसतं का? आता पुढे काय?? 10 प्रश्नांमधून समजून घ्या प्रक्रिया आहे तरी काय?


Vinesh Phogat : विनेश कोणत्या परिस्थितीतून जात असेल याचा विचार करु शकत नाही, साक्षी मलिकची भावनिक पोस्ट