Vinesh Phogat: भारताची कुस्तीपटू  विनेश फोगटचा (Vinesh Phogat) हिच्या 50 किलो वजनी गटातील अपात्रतेबाबतचा निकाल आंतरराष्ट्रीय क्रीडा कोर्टाने (सीएएस) पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) संपल्यानंतर म्हणजेच 13 ऑगस्टपर्यंत (मंगळवार) राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज सायंकाळी सहापर्यंत याप्रकरणी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र याचदरम्यान विनेश फोगाटचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 


विनेश फोगाट पॅरिसहून भारतासाठी रवाना झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या अमन सेहरावतसह विनेश फोगाट आज नवी दिल्लीत दाखल होणार आहे. विनेश फोगाट आज भारतीय वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरेल. सीएएसने अद्याप कोणताही निर्णय न दिल्यामुळे विनेश फोगाट पदक न घेताच मायदेशी परत असल्याचं सांगण्यात येत आहे. 






विनेश फोगाट अंतिम फेरीपर्यंत पोहचली होती-


विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 4 वेळची विश्वविजेती आणि गत ऑलिम्पिक चॅम्पियन जपानची युई सुसाकी हिचा पहिल्याच फेरीत पराभव करून आघाडी दिली होती. उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत विनेश फोगाटने कोणताही फाऊल न करता विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली. मात्र अंतिम सामन्याच्या दिवशी विनेश फोगाटचे वजन निर्धारीत वजनापेक्षा 100 ग्रॅम अधिक असल्याचे आढळून आले. त्यामुळे विनेशला कोणतचं पदक मिळाले नाही.


युक्तीवादात नेमकं काय घडलं?


एका अहवालानूसार, UWW केवळ पुस्तकांच्या आधारे खटला लढत आहे. परंतु हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया यांनी केवळ नियमांचा विषय नाहीय, तर त्याहून अजून बरेच काही आहे, असा महत्वाचा युक्तिवाद केला. दरम्यान विनेश फोगाटचे वकील भारतीय बाजू कुठेतरी नियमांवर प्रश्न उपस्थित करत आहे. सीएएसचा निर्णय विनेश फोगाटच्या बाजूने येण्याची शक्यता खूप जास्त असल्याचेही समोर आले आहे.


विनेश फोगाटला विचारले तीन महत्वाचे प्रश्न-


सीएएसने विनेशला ई-मेलद्वारे तीन प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. यातील पहिला प्रश्न, तुला दुसऱ्या दिवशीही वजन करावे लागेल या नियमाची जाणीव होती का? दुसरा प्रश्न रौप्य पदकाशी संबंधित आहे. विनेशला विचारण्यात आले आहे की, क्यूबन कुस्तीपटू तुमच्यासोबत रौप्य पदक शेअर करेल का? आणि तुम्हाला या अपीलचा निर्णय सार्वजनिकपणे जाहीर करायचा आहे की गोपनीय पद्धतीने तो जाहीर करायचा आहे?, असा सवाल विनेशला विचारल्याची माहिती समोर येत आहे.


संबंधित बातमी:


विनेश फोगाटच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, सीएएसही पेचात; पदक मिळणार जवळपास निश्चित?, महत्वाची माहिती समोर