Vinesh Phogat Said Goodbye To Wrestling: भारताची धडाकेबाज महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिनं कुस्तीला (Wrestling) अलविदा केलं आहे. सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत विनेशनं याबाबत माहिती दिली. विनेश फोगाटनं आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "आई... कुस्ती जिंकली, मी हरलेय, माफ कर मला, तुझे स्वप्न, माझं धैर्य, सगळं काही संपलंय, यापेक्षा जास्त ताकद आता माझ्यात राहिलेली नाही. अलविदा कुस्ती 2001-2024. तुम्ही सर्व सदैव माझ्यासोबत असाल, मी ऋणी राहीन.", असं म्हणत जड अंतःकरणानं विनेशनं प्राणाहून प्रिय असलेल्या कुस्तीला अलविदा म्हटलंय.
विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकसाठी क्वॉलिफाय झाली खरी, पण ती अंतिम फेरीपर्यंतची मजल मारेल, असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण ती जिद्दीनं लढली. तिनं एकापाठोपाठ एक असे तीन सामने खेळले. अन् मोठ्या थाटात अंतिम फेरी गाठली.
विनेश फोगाटनं तिच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना 5-0 च्या फरकानं जिंकला. प्रतिस्पर्ध्यासाठी तिनं साधा एक गुणंही सोडला नव्हता. त्यावेळी विनेशची देहबोली प्रत्येक भारतीयाला जणू सांगत होती की, तयारी करा मी गोल्ड घेऊन येतेय. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. पण, काही ग्रॅम वजन पात्र ठरलं आणि विनेशला सुवर्णपदकाच्या सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं. तिला लढायचं होतं, पण रणांगणात येण्यापूर्वीच ती अपात्र ठरली.
हरली नाही, तिला पराभूत करण्यात आलं... : बजरंग पुनिया
विनेशच्या या घोषणेनंतर कुस्तीपटू बजरंग पुनियानं सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आणि पोस्ट केली. त्यानं लिहिलं की, "विनेश, तू पराभूत झाला नाहीस, तू आमच्यासाठी नेहमीच विजेता राहशील, तू भारताची कन्या आहेस, तू भारताचा अभिमान आहेस."
विनेश फोगाटला जास्त वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यातून अपात्र ठरवण्यात आलं होतं, त्यानंतर तिनं क्रीडा लवादाच्या न्यायालयात (सीएएस) अपील केलं होतं. या स्पर्धेसाठी तिला रौप्यपदक देण्यात यावं, अशी मागणी विनेश फोगाट केली होती.
वजन जास्त भरल्यामुळे विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र
कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिकमध्ये अपात्र घोषित करण्यात आलं. 50 किलो गटात तिचं वजन सुमारे 100 ग्रॅम अधिक असल्याचं आढळून आलं. विनेशला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती, पण वजन जास्त असल्यानं अंतिम सामन्याच्या काही तास आधीच तिला अपात्र ठरवण्यात आलं. अशा परिस्थितीत नियमांमुळे उपांत्य फेरीत धमाकेदार विजय मिळवूनही विनेशचं 'गोल्ड'न स्वप्न भंगलं आणि कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांचाही चुरडा झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :