Vinesh Phogat Disqualified Paris Olympics 2024: भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) इतिहास घडवला अन आजवरच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत (Paris Olympics 2024) अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिली महिला कुस्तीपटू ठरली. विनेश आज भारताला यंदाचं पहिलं सुवर्णपदक ही मिळवून देईल, अशी आशा प्रत्येक भारतीयाला होती. मात्र हा आनंद आजच्या सकाळने हिरावून घेतला. कारण कालच्या पेक्षा विनेशचे आजचे वनज 100 ग्रॅम जास्त आढळल्यानं, ऑलिम्पिकने तिला अपात्र ठरवले. 


विनेश फोगाट ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरताच कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या मुलाची प्रतिक्रिया समोर आली आहे. विनेश फोगाट ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरताच करण बृजभूषण सिंह संसदेतून घाईघाईने बाहेर पडला आणि कॅमेऱ्यांनी घेरताच, हे देशाचं नुकसान आहे. अपील केलं पाहिजे, कुस्ती महासंघ योग्य पावलं उचलेल, अशी प्रतिक्रिया करण सिंह याने दिली.






विनेश फोगटच्या सासऱ्याचा गंभीर आरोप-


विनेशच्या कुटुंबीयांनी फेडरेशननं षड्यंत्र रचल्याचा आरोप केला आहे. विनेश फोगाटचे सासरे राजपाल राठी यांनी एबीपी न्यूजशी बातचित केली. ते म्हणाले की, 100 ग्रॅम वजन किती जास्त असतं? डोक्यावरच्या केसांमुळेही 100 ग्रॅम वजन वाढू शकतं. याशिवाय त्यांनी सरकार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रीजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले. यात सरकार आणि ब्रीजभूषण शरण सिंह यांचा हात असल्याचंही ते म्हणाले आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन-


विनेश फोगाटला अपात्र ठरवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पीटी उषा यांच्याकडून या विषयावर आणि विनेशला अपात्र ठरवल्यानंतर आता भारताकडे कोणते पर्याय आहेत याबद्दल प्राथमिक माहिती घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान मोदींनी पी. टी. उषा यांना विनेश फोगटच्या प्रकरणात तिला मदत करण्यासाठी सर्व पर्यायांचा शोध घेण्यास सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विनेशला मदत होणार असेल तर तिच्या अपात्रतेबद्दल तीव्र निषेध नोंदवावा, अपील दाखल करावे अशीही सूचना पीएम मोदी यांनी पीटी उषा यांना केली आहे. 


केस कापले, रक्तही काढलं-


मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनेश फोगटनं सेमीफायनल जिंकल्यानंतर आराम केला नाही. तिनं रात्रभर जागून तिचं अतिरिक्त वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न केला. स्पोर्ट्स स्टारच्या रिपोर्टनुसार, विनेश फोगटनं वजन कमी करण्यासाठी सायकलिंग केली, तिनं स्किपिंग केली. एवढंच नाही तर या खेळाडूनं आपले केस आणि नखंही कापली. धक्कादायक बाब म्हणजे, एवढं असूनही विनेशला निर्धारित मर्यादा गाठता आली नाही. 


संबंधित बातमी:


Vinesh Phogat: विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र; भारताला मोठा धक्का, एका रात्रीत काय घडलं?