पॅरिस : भारताची पैलवान विनेश फोगटनं (Vinesh Phogat) 50 किलो फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics) उपांत्य फेरीत धडक दिली आहे. उपांत्यपूर्व फेरीत विनेश फोगटची लढत यूक्रेनच्या ओकसाना लिवाच हिच्याशी होती. विनेश फोगटनं अखेरच्या मिनिटात आक्रमक खेळ करत 7-5 अशा फरकानं विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 


यूक्रेनच्या ओकासाना लिवाच हिचा 7-5 पराभव करत विनेश फोगटनं उपांत्य फेरीत प्रवेश केली. 


उपांत्यपूर्व फेरीत  भारताची पैलवान विनेश फोगट हिनं 50 किलो ग्राम वजनी गटात टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या युई सुसाकीला पराभूत केलं  होतं. विनेश फोगटनं टेक्निकल पॉईंटच्या आधारे विजय मिळवला. उपांत्य पूर्व फेरीत विनेश फोगटनं ओकासाना लिवाच हिचा 7-5 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक दिली आहे


50 किलो महिला फ्री स्टाईल कुस्ती प्रकाराची उपांत्य फेरीच्या लढतींना आज रात्री साडे नऊ वाजता सुरुवात होणार आहे. उपांत्य फेरीत विनेश फोगटची लढत क्यूबाची पैलवान वाय. गुझमन हिच्यासोबत होणार आहे. गुझमन हिनं उपांत्यपूर्व फेरीत तिची प्रतिस्पर्धी असलेल्या खेळाडूचा 10-0 असा पराभव केला. विनेश फोगट हिचा उपांत्य फेरीचा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री 10.15 मिनिटांनी सुरु होईल. 


विनेश फोगटला इतिहास रचण्याची संधी 


विनेश फोगटनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत विनेश फोगट हिची लढत एकही सामना न गमावणाऱ्या जपनाच्या सुसाकीला विरुद्ध होती. मात्र, टेक्निकल पॉईंटच्या आधारे विनेश फोगटनं सुसाकीला 3-2 असं पराभूत केलं आणि उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला. कुस्ती प्रकारात विनेश फोगट भारताला पहिलं पदक मिळवून देणार का याची देखील सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली आहे.


नीरज चोप्राकडून देशाला सुवर्णपदकाची आशा 


भारताचा भालाफेक पटू नीरज चोप्रा यानं भालाफेक स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत त्याच्या विरोधात पाकिस्तानच्या खेळाडूचं आव्हान असेल. नीरज चोप्रानं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला एकमेव सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. आता पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राकडून सुवर्णपदकाची आशा आहे.  तर, महाराष्ट्राचा लेक अविनाश साबळे देखील स्टीपलचेस 3 हजार मीटर स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.


संबंधित बातम्या :


Neeraj Chopra : नीरज चोप्राचा अंतिम फेरीत पाकिस्तानच्या खेळाडूशी सामना, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत पुन्हा इतिहास रचण्याची संधी


Avinash Sable : महाराष्ट्राच्या लेकानं करुन दाखवलं, अविनाश साबळेची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 3 हजार मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत धडक


बातमी अपडेट होत आहे...