टोकियो : भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमला 51 किलो वजनी गटात हार पत्करावी लागली आहे. या पराभवामुळे मेरी कोम टोकियो ऑलिम्पिकमधून बाहेर पडलीय. आजच्या या पराभवामुळे तमाम भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. मेरी कोमकडून सर्वांना पदकाची अपेक्षा होती. 16 व्या फेरीत मेरी कोमचा सामना कोलंबियाच्या इग्रिट लोरेना वॅलेन्सियाशी झावला. यात मेरी कोम 2-3 अशा फरकाने पराभूत झाली.


टोकियो ऑलिम्पिकमधील मेरी कोमचा प्रवास आता थांबला आहे. प्री-क्वार्टर फायनलमध्ये सहा वेळा विश्वविजेती राहिलेल्या मेरी कोमला कोलंबियाच्या खेळाडूकडून 2-3 असा पराभवाचा सामना करावा लागला.


टोकियो ऑलिम्पिकमधील महिला फ्लायवेट 51 किलोग्राम वजनी गटात 16 व्या फेरीच्या सामन्यात सहा वेळा विश्वविजेतेपद मिळवणारी भारतीय बॉक्सर एमसी मेरी कॉम कोलंबियाच्या इंग्रीट लोरेना वॅलेन्सियाकडून पराभूत झाली. भारताकडून पदकाची प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मेरी कोमला सामन्यात वॅलेन्सियाने 3-2 ने पराभूत केले.


प्री-क्वार्टर फायनल सामन्यात मेरी कोमच्या पराभवामुळे भारताच्या पदकांच्या आशेला मोठा धक्का बसला आहे. वॅलेन्सिया तिच्या कामगिरीने तीन परीक्षकांना प्रभावित करण्यात यशस्वी झाली, तर मेरी कोमने केवळ दोन परीक्षकांना प्रभावित केले.


टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज सातव्या दिवशी झालेल्या 51 किलो वजनी गटातील 16 व्या फेरीच्या सामन्यात भारतीय महिला बॉक्सर एमसी मेरी कोमचा सामना कोलंबियाच्या इंग्रीट लोरेना वॅलेन्सियाशी झाला. या सामन्याच्या पहिल्या फेरीत मेरी कोमचा 1-4 असा पराभव झाला. पण दुसर्‍या फेरीत मेरी कोमने 3-2 असा विजय नोंदवून नेत्रदीपक पुनरागमन केले.


पहिल्या फेरीत मेरी कोम बचावात्मक दिसली, तर दुसर्‍या फेरीत तिने आक्रमक खेळ दाखविला. मात्र, मेरी कोमला तिसर्‍या फेरीत 2-3 असा पराभव पत्करावा लागला. यासह बॉक्सिंगमधील भारताच्या पदकांच्या आशा देखील संपुष्टात आल्या.