Tokyo Olympics: बॉक्सर सतिश कुमार (Satish Kumar)  91 किलो वजनगटाच्या सुपर हेविवेट कॅटेगरीत क्वार्टर फायनल मॅचमध्ये हरला.  उजबेकिस्तानचा बॉक्सर बखोदिर जालोलोव यानं सतिशला 5-0 असं पराजित केलं. सुरुवातीला आक्रमक असणारा सतिश आधीच्या सामन्यातील दुखापतीमुळं आपली आक्रमकता कायम ठेवू शकला नाही आणि त्याला हार पत्कारावी लागली. सतिश या सामन्यात जरी हरला असला तरी कोट्यवधी भारतीयांची मनं मात्र जिंकली आहेत.  
 
क्वार्टर फायनलमध्ये सतिश पराभूत झाला मात्र त्याच्यावर तरीही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी सतिशच्या कामगिरीचं कौतुक केलं असून देशाची मान उंचावणारी कामगिरी केली असल्याचं म्हटलं आहे.  


Tokyo Olympics 2020 LIVE : बॉक्सिंगमध्ये सतिशकुमारकडून निराशा, क्वार्टर फायनलमध्ये पराभव, आव्हान संपुष्टात


मागील फाईटदरम्यान सतिश च्या चेहऱ्यावर दुखापत झाली होती. आजच्या मॅचदरम्यान विरोधी विरोधी बॉक्सरचा पंच त्याच्या चेहऱ्यावर बसला त्यामुळं आधीच्या जखमेवर प्रहार झाला. जखम ताजी असतानाही तो शेवटपर्यंत त्वेषानं लढत होता. 


Kamal Preet Kaur : कमलप्रीत कौरनं रचला इतिहास, डिस्कस थ्रोमध्ये भारताला पदकाची अपेक्षा


फुटबॉलर ते बॉक्सर असा प्रवास करणारा सतिशचा प्रतिस्पर्धी  जालोलोवनं देखील आपलं पदक पक्कं केल्यानंतर सतिशच्या हिमतीची दाद दिली.  सतीश सुपर हेविवेटमध्ये क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचणारा पहिला भारतीय बॉक्सर ठरला आहे.  


Lovlina Borgohain PHOTO : लवलीनावर शुभेच्छांचा वर्षाव, ऑलिम्पिक पदकापर्यंतचा खडतर प्रवास


दुखापत असतानाही सतिशनं शेवटपर्यंत मैदान सोडलं नाही. इतकंच नाही तर विरोधी खेळाडूवर चांगले प्रहार देखील केले. सोबत चांगला डिफेन्स देखील केला. त्याच्या या खेळभावनेचं चांगलंच कौतुक होत आहे. सोशल मीडियावर सतिशकुमार ट्रेंड होत असून चाहते त्याच्या कौतुकाचा वर्षाव करत आहेत.  


हॉकी- भारतीय टीम सेमीफायनलला जाणार?
भारतीय हॉकी संघाकडे आज सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे.  भारतीय हॉकी टीमनं आतापर्यंत टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगलं प्रदर्शन केलं आहे. भारताची टक्कर आज ग्रेट ब्रिटेनसोबत आहे.  


पीव्ही सिंधू कांस्यपदकासाठी लढणार 
सर्व भारतीयांचं लक्ष आज पीव्ही सिंधूच्या कामगिरीकडे आहे. काल सेमिफायनल हरल्यानंतर पीव्ही सिंधू आज कांस्य पदकासाठी लढणार आहे.