Tokyo Olympics 2020 LIVE :  महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनानं (Lovlina Borgohai Medal)जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली आहे. या विजयासह लवलीनानं इतिहास रचला असून भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं आहे. क्वार्टर फायनलमध्ये भारताच्या लवलीनानं चिनी तायपेच्या निएन चिन चेनला पराभूत करत पदकावर शिक्कामोर्तब केलं आहे. 69 किलोग्राम गटात लवलिनानं भारताला आणखी एका पदक मिळवून दिलं आहे.


Tokyo Olympics 2020 LIVE : महिला बॉक्सिंगमध्ये लवलिनाची जबरदस्त कामगिरी, उपांत्यपूर्व फेरीत शानदार विजय, भारताचं आणखी एक पदक निश्चित


चिनी तायपेच्या निएन चिन चेन हिला पराभूत करत लवलीनानं मेडल निश्चित केलं आहे. लवलीनानं आता सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये ती पराभूत जरी झाली तरी तिला कांस्य पदक तरी मिळणार आहे.  






69 किलोग्राम गटात लवलीना भारताकडून मेडल जिंकणारी पहिली महिला खेळाडू आहे. लवलीनाकडे भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याची संधी आहे. मात्र यासाठी लवलीनाला आणखी दोन सामने जिंकावे लागणार आहेत.  


60 किलो वजनगटात भारताच्या सिमरनजीतचा पराभव




लवलीनाच्या सामन्याआधी महिला बॉक्सिंगमध्ये 60 किलो वजनगटात भारताला निराशा हाती लागली. भारताच्या सिमरनजीतचा पराभव झाल्यानं तिचं आव्हान संपुष्टात आलं. सिमरनजीतचा 5-0 अशा फरकानं हार पत्कारावी लागली. यासोबतच सिमरनजीतचं ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलं.

 




नेमबाज मनु भाकरचं आव्हान संपुष्टात

नेमबाजीत भारतासाठी पदकाची अपेक्षा संपताना दिसत आहे. 25 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये क्वालिफिकेशन आणि रॅपिड राउंडमध्ये मनु भाकरनं एकूण 582 गुण मिळवले आणि ती 11व्या क्रमांकावर राहिली. टॉप 8 खेळाडूंनाच फायनल्समध्ये स्थान मिळतं. त्यामुळे आपलं पहिलं ऑलिम्पिक खेळणाऱ्या मनु भाकरचं आव्हान संपुष्टात आलं आहे. 










तीरंदाजीत भारताची कमाल, दीपिका कुमारीची क्वार्टर फायनल्समध्ये धडक

तीरंदाजीत दीपिका कुमारीनं क्वार्टर फायनल्समध्ये धडक दिली आहे. भारताला दीपिका कुमारीकडून पदकाची अपेक्षा आहे. दीपिका कुमारी जगातील अव्वल तीरंदाजांपैकी एक आहे. दीपिका कुमारी आज क्वार्टर फायनल्सच्या सामना आज खेळणार आहे.  दीपिकाचा पती आणि भारतीय तीरंदाज अतानू दासनंही क्वार्टर फायनल्समध्ये स्थान मिळवलं आहे.