CAS Verdict on Vinesh Phogat नवी दिल्ली : भारताची पैलवान विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिनं पॅरिस ऑलिम्पिकच्या 50 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकाराच्या स्पर्धेत अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र, त्यापूर्वी घेण्यात आलेल्या चाचणीत विनेश फोगाटचं वजन 100 ग्रॅमनं जास्त नोंदवलं गेल्यानं  तिला निलंबित करण्यात आलं होतं. विनेश फोगाटनं या प्रकरणी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टसमध्ये याचिका दाखल केली होती. या प्रकरणात CAS कडून आज निर्णय येणार आहे. विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार की नाही याबाबतची उत्सुकता देशवासियांना लागून राहिलेली आहे. विनेश फोगाटच्या चार वकिलांपैकी एक असलेल्या विदुष्पत सिंघानिया (Vidushpat Singhania)  यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
    
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत विदुष्पत सिंघानिया यांनी सांगितलं की त्यांनी CAS समोर मेहनत घेत विनेश फोगाटची बाजू मांडली आहे. विनेश फोगाटला पदक नक्की मिळेल, असं ते म्हणाले. आम्हा सर्वांना पदकाची आशा आहे, आम्ही यासाठी याचाकि दाखल केली होती. CAS च्या एड हॉकच्या पॅनेलला 24 तासात निर्णय जाहीर करायचा असतो. मात्र, विनेश फोगाट प्रकरणात निर्णय जाहीर करण्याला स्थगिती देण्यात आलाी. विनेश फोगाटचे वकील सिंघानिया म्हणाले की न्यायमूर्ती या प्रकरणात गांभीर्यपर्वक अधिक विचार करत असतील तर ते आमच्यासाठी चांगलं आहे. 


ऐतिहासिक निर्णयाची अपेक्षा  


विदुष्पत सिंघानिया यांनी म्हटलं की ते यापूर्वी देखील CAS मध्ये केस लढले आहेत. मात्र, इथं प्रकरणामध्ये विजय मिळवण्याची शक्यता कमी असते. विनेश फोगाटच्या बाबतीत ऐतिहासिक निर्णयाची अपेक्षा आहे. हे थोडं कठीण वाटत आहे मात्र सर्वजण ऐतिहासिक निर्णयाची अपेक्षा करतोय, असं सिंघानिया म्हणाले. विनेश फोगाटला पदक मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केला आहे. याशिवाय जरी पदक नाही मिळालं तरी विनेश फोगाट चॅम्पियन खेळाडू आहे, असं सिंघानिया म्हणाले.  
  
विनेश फोगाटचा  एक व्हिडीओ समोर आला असून ती पॅरिसमधून भारतात नवी दिल्लीत दाखल होईल. या प्रकरणातील सुनावणी 9 ऑगस्टला झाली होती. मात्र, प्रकरणाचं गांभीर्य पाहून CAS नं निर्णय जाहीर करण्यासाठी वेळ घेतला होता.  


दरम्यान, या सर्व घटनेनंतर विनेश फोगाटनं कुस्तीमधून निवृत्ती देखील जाहीर केली होती. बबिता फोगाट हिनं विनेश फोगाट कुस्तीबाबतचा निर्णय मागं घेईल, असे संकेत दिले होते.


संबंधित बातम्या :


Vinesh Phogat: विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार का?  CAS समोरील सुनावणीत काय घडलं? मोठी अपडेट समोर